In Mapusa, tax collection at doorstep on the cards

Posted On July 8, 2016 By In Local, Top Stories


म्हापसा पालिकेने कर वसुलीसाठी जिथल्या तिथे बिल आणि कर वसुली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

voice over
या नव्या कर वसुली योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी दिली. पालिकेकडून एकूण १५ कर वसूल केले जातात. करांची रक्कम भरणा करण्यासाठी लोकांना पालिका कार्यालयात यावे लागते. तसेच कार्यालयात मोठय़ा रांगा लागत असल्याने ताटकळत राहावे लागते. नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी घरोघरी जाऊन बिले देऊन कर गोळा करण्याची योजना आखली आहे. तिथल्या तिथे बिले व कर वसुली योजनेद्वारे पालिका प्रशासन लोकांच्या दारी नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या योजनेद्वारे करदात्यांना पालिकेत येऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही. त्यांचा वेळ वाचेल शिवाय पालिकेला वेगवेगळ्या करांच्या रूपाने देय असलेली रक्कम वेळोवेळी वसूल होईल, तसेच थकबाकीही वसूल होईल.

म्हापसा पालिका क्षेत्रात जुन्या घरांच्या जागी आता मोठमोठय़ा निवासी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणार्‍या लोकांना घरपट्टी लागू केली. मात्र, पालिका कार्यालयातील कागदपत्रांत मोडलेल्या व आता अस्तित्वात नसलेल्या घरांच्या नोंदी आहेत. यामुळे अस्तित्वात नसलेल्या घरांची घरपट्टी वसुलीची बिले जारी केली जातात. याशिवाय घर क्रमांकाच्या बाबतीतही समस्या निर्माण होतात. अस्तित्वात नसलेल्या घरांच्या नोंदी पालिका रेकॉर्डमधून काढून टाकण्याच्या बाबतीत बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसंच गांधी चौकाच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.

225
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close