INTERNATIONAL YOGA DAY CELEBRATED AT SHYAMA PRASAD MUKHERJEE INDOOR STADIUM

Posted On June 21, 2016 By In Local, People, Top Stories


हजारो गोमंतकीयांनी साधला उत्तम ‘योग’
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कार्यक्रम
मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी यांचा समावेश

दाबोळी विमान प्रवाशांनी केली योगासने
देशविदेशांतील शेकडो प्रवाशांनी घेतला लाभ

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हजारो गोमंतकीयांनी उत्तम योग साधला. कार्यक्रमाचं उद्घाटन सकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर, विद्यार्थी सहभागी झाले होते.

voice over
योगाच्या माध्यमातून भारत देश आज जगाचे नेतृत्व करीत आहे. भारत देश हा योगाचे केंद्र मानले जात आहे. जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य योगविद्येमुळे देशाला प्राप्त झाले आहे.

संयुक्त राष्ट्र संघानंही योगाला मान्यता दिल्यानं आता ‘२१ जून’ हा दिवस जगभरातील शेकडो देशांत योग दिवस म्हणून आयोजित केला जातो. त्यादृष्टीनं गोवा सरकारनंही क्रीडा खात्यामार्फत राज्यभरात योग दिनाचं आयोजन केलं होतं. राज्यस्तरावरील कार्यक्रम डॉ. मुखर्जी स्टेडियमवर पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.

245
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close