JAYANCHI PUJA CELEBRATED AT MARDOL

Posted On September 20, 2016 By In Local, Off-Beat, People, Top Storiesम्हार्दोळात जायांची पूजा उत्साहात
‘नाईक फुलकार समाजा’ने केली पूजा
यंदा पूजेला १०३ वर्षे पूर्ण

म्हार्दोळच्या श्री महालसा देवस्थानात ‘नाईक फुलकार समाजा’तर्फे सोमवारी जायांची पूजा करण्यात आली. यावेळी म्हार्दोळ परिसरातील समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

भाद्रपद वद्य द्वितीया हा दिवस म्हार्दोळच्या फुलकारांचा मोठ्या पर्वणीचा दिवस. सुप्रसिद्ध जायांची पूजा येथील श्री महालसा मंदिरात दरवर्षी याच दिवशी साजरी केली जाते. जवळ जवळ ५०-६० कुटुंबाकडून हा उत्सव संपन्न होत असतो. यंदा या पूजेला १०३ वर्षे पूर्ण झाली. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रती वर्षी निरनिराळ्या एका वाहनाची निवड केली जाते. उदा. विजयरथ, हत्ती अंबारी, हंस वाहन, गरूड वाहन, शेषवाहन, सिंहासन, गजान्तलक्ष्मी, विमान, मखर, इत्यादी विविध कलाकृती विविध प्रकारची फुले आणि असंख्य जाईच्या माळांचा वापर करून वाहन सुशोभित केले जाते. त्या वाहनात श्री सत्यनारायण महापूजा केली जाते.

श्री महालसा देवीच्या भव्य सभामंडपात ही श्री सत्यनारायण महापूजा केली जाते. या पूजेसाठी दोन दिवस जायांची फुले विक्री करण्यास बंदी असते. या दोन दिवसांत ५० ते ६० कुटुंबियांकडून जाईच्या माळा पूजेसाठी वापरल्या जातात. येथील प्रसिद्ध श्री महालसा देवीच्या आणि सातेरी देवीच्या तसंच इतर पंचायतन दैवतांच्या मंदिरात सर्वत्र जाईच्या माळा बांधलेल्या असतात. तसंच देव-दैवतांच्या अंगावर जाईंच्या माळा घातलेल्या असतात. या जाईंचा सुगंध संपूर्ण मंदिरात आणि त्याच्या परिसरात दरवळलेला असतो. याठिकाणी असंख्य भाविकजनांची ये-जा चालू असते. हे पाहून जणू ही वैकुंठ नगरीच आहे, असे प्रत्येक भाविकाला वाटते.

206
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close