JUDICIAL INQUIRY OF GOA SAHAKARI BANK : CM

Posted On August 11, 2016 By In Local, Politics, Top Storiesगोवा सहकारी बँकेतील घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे सभागृहाला आश्वासन
मौल्यवान मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्याचा आरोप
सहकार निबंधक आणि बँक संचालकांची मिलीभगत असल्याचा आरोप

गोवा राज्य सहकारी सोसायटी बँकेत मौल्यवान मालमत्तेचा कवडीमोल भावात लिलाव करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिलं. सहकार निबंधक आणि सोसायटीचे अध्यक्ष यांनी संगनमतानं बँकेत घोटाळा केल्याचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई आणि आमदार दिगंबर कामत यांनी सभागृहासमोर मांडला होता. यावेळी सर्व विरोधकांबरोबरच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीदेखील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासनं दिलं.

212
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close