MADKAI MURDER : WILL FACEBOOK HELP TO SOLVE THE CRIME?

Posted On September 16, 2016 By In Crime, Local, People, Top Storiesलाडेवाडा-मडकई येथे युवतीचा गोळी झाडून खून
लोटली येथील युवकाचे कृत्य
युवतीच्या खुनानंतर युवकाने स्वत:वर झाडली गोळी
युवक गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल
दुर्दैवी युवतीचे नाव सुजाता नाईक

लाडेवाडा-मडकई इथं गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या सुजाता नाईक खून प्रकरणानं संपूर्ण गोवा हदरून गेला. मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या युवकानं सुजाताच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या अन नंतर स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या हा युवक गोमेकॉंत उपचारासाठी भरती आहे. कुमारावस्थेत सुजाता आणि निखील यांच्यामध्ये घडलेल्या या प्रकारानं गोव्यातील सुजाण नागरिकदेखील मनं सुन्न झाली. अखेर असं काय घडलं असावं… निखिलनं हा टोकाचा निर्णय का घेतला असावा… अखेर तरुणाई इतक्या टोकाला का जात आहे आणि… हे रोखण्यासाठी काही मार्ग आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकणारा ‘इन गोवा’चा हा खास रिपोर्ट…
……

मडकईतील लाडेवाडा भाग तसा शांत… मात्र गुरुवारी संध्याकाळी हा शांत परिसर बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजांनी हादरून गेला… जोपर्यंत लोक काही समजणार… इतक्यात एका कॉलेज युवकानं गावातील गोकुळदास नाईक या प्रतिष्ठीत नागरिकाच्या घरात घुसून त्यांच्या एकूलत्या एक मुलीला मृत्युच्या झोपेत ढकलून दिलं… इतकंच नव्हे तर खुनी युवकानं स्वत:वरही गोळ्या झाडून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

गुरुवारी संध्याकाळी मडगावच्या लोटली भागात राहणाऱ्या निखिल कुमार या १९ वर्षीय युवकाने वडिलांची बंदूक आणून सुजाता नाईक या कॉलेज युवतीच्या घरात घुसून धडाधड दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी सुजातानं चुकवली ही गोळी घराच्या भिंतीवर जाऊन आदळली. त्यानंतर सुजाताच्या आईनं निखीलला अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र निखिलनं अचूक गोळी झाडली. ही दुसरी गोळी युवतीच्या छातीतून आरपार गेली अन युवती जागीच गतप्राण झाली.

सुजाताचा प्राण घेतल्यानंतर निखिलनं स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. स्वत:वर गोळी झाडल्यानंतर निखील एका खोलीत गेला आणि आतून त्यानं दार बंद करून घेतलं. या घटनेमुळं गांगरून गेलेल्या सुजाताच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली. हा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारीही घटनास्थळी धावले; पण गोळ्यांचा आवाज ऐकून घरात शिरण्याचं धाडस कोणीही करू शकलं नाही. अखेर पोलिसांना ही खबर मिळताच त्यांनी येऊन निखीलला जखमी अवस्थेत उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती केलंय.

गुरुवारी संध्याकाळी मडकईच्या लाडेवाडा घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गोवा हादरून गेला. अखेर निखिलनं सुजाताबरोबर स्वत:चं जीवन संपवण्याची इतकी टोकाची भूमिका का घेतली? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आता याचं उत्तर निखिलची जबानी मिळेपर्यंत मिळनं कठीण आहे; मात्र इन गोवानं या सर्व घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. काय आहे वस्तुस्थिती, नक्की काय घडलं असावं, हे कसं घडलं असावं आणि कशासाठी घडलं असावं, या सगळ्यांचं उत्तर पहा एका छोट्याशा विश्रांतीनंतर….

226
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close