MAPUSA MUNCIPALITY VACATES 3 DAY CHATURTHI BAZAR IN MAPUSA

Posted On August 22, 2017 By In Local, People, Top Stories


पालिकेने उठवला तीन दिवसांचा चतुर्थी बाजार
माटोळी विक्रेत्यांना पालिकेने उठवले
माटोळी विक्रेते बनले संतप्त

दरवर्षी चतुर्थीपूर्वी म्हापसा बाजारपेठेत तीन दिवसांचा माटोळीचा बाजार भरवला जातो. यंदा या बाजारावर पालिकेने कारवाई करत विक्रेत्यांना उठवल्यानं मंगळवारी बाजारपेठेत गोंधळ माजला. बार्देशातील ग्रामीण भागातील महिला सोमवारी माटोळीचे सामान घेऊन दरवर्षीप्रमाणे बाजारात दाखल झाल्या होत्या. त्यासाठी पालिकेचा सोपोकरही भरला होता; मात्र अचानक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन या व्यापाऱ्यांना बाजार हटवण्याचा आदेश दिला. स्थानिकांवर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी व्यापाऱ्यांनी दिला.

229
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close