MEETING OF ALL GOA BAR AND RESTAURANT OWNERS ASSOCIATION ON 9TH MARCH

Posted On March 7, 2017 By In Local, People, Top Stories


फोंड्यात मद्यविक्रेता संघटनेची ९ मार्चला बैठक
बंदीच्या टांगत्या तलवारीवर होणार चर्चा

‘अखिल गोवा मद्यविक्री संघटने’ची महत्त्वपूर्ण बैठक ९ मार्चला फोंडा इथं आयोजित करण्यात आलीये. ही बैठक कवळे पंचायत हॉलमध्ये सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घेण्यात येणार आहे. या बैठकीला फोंड्यातील मद्यविक्रेत्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संघटनेनं केलंय.
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या महामार्गावरील बारबंदी आदेशाचे गंभीर परिणाम मद्यव्यावसायिकांवर होण्याची शक्यता निर्माण झालीये. त्यामुळं मद्यव्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीये. ३१ मार्चनंतर महामार्गावरील मद्यालयांचे भवितव्य काय? हा प्रश्न गोव्यातील बारमालक संघटनेसमोर आहे. गोव्यात ३३२ घाऊक विक्री करणारे व्यावसायिक असून मद्य उपलब्ध करून देणारे ९ हजार ४४५ बार आणि रेस्टॉरंट आहेत. याव्यतिरिक्त केवळ मद्यविक्रीच करणारी अनेक दुकाने आहेत. याबाबत आता सरकार कोणती भूमिका घेते यावर या मद्यव्यावसायिकांचे भवितव्य अवलंबून आहे. आता नव्याने राज्यातील अन्य २१ मार्गांचे महामार्गात रूपांतर करण्याच्या निर्णयामुळे मद्यव्यवसायावर मोठे संकट आले आहे. राज्यातील अंतर्गत रस्ते महामार्ग म्हणून निश्चित झाले तर राज्यातील अन्य मद्यालयेही बंद होणार आहेत. त्यामुळे राज्यातील ९० टक्के व्यवसाय बंद होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फोंड्यातील बैठकीत चर्चा केली जाणाराहे. सध्या अखिल गोवा मद्यविक्रेते संघटना प्रत्येक तालुक्यात जाऊन बंदीक्षेत्रातील मद्यविक्रेत्यांना संघटीत करत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी कवळे पंचायत सभागृहात फोंड्यातील मद्यविक्रेत्यांची बैठक बोलावण्यात आलीये. या बैठकीस फोंड्यातील सर्व मद्यविक्रेत्यांनी यांची या बैठकीस उपस्थित राहावे, असं आवाहन संघटनेनं केलंय.

283
SHARES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close