Mob of Sesa workers gherao Bicholim PS

Posted On December 14, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


‘सेसा’च्या दोन कामगारांना मारहाण
डिचोली पोलिसांत तक्रार दाखल; अकरा जणांना केली अटक
आंदोलन झुगारून दोघेजण कामावर गेल्यानं तणाव
पोलिसांनी ११ कामगारांना अटक केल्यानं पोलीस स्थानकालाही घेराव
कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनाही आणले जेरीस

‘सेसा’ मायनिंग कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात गेले ५८ दिवस चालू असलेल्या संघर्षाला बुधवारी सकाळी वेगळे वळण लागलं. दोन कामगार आंदोलनाला छेद देऊन कामावर रुजू झाल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या अन्य कामगारांनी त्यांना मारहाण केली. जगदीश आरोंदेकर आणि गोविंद लावणीस अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावं आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरून आलेल्या या कामगारांना सुमारे शंभर जणांच्या जमावाने घेरुन धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. या मारहाणप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गुरुवारी सकाळी ११ कामगारांना अटक केली.

दरम्यान, गुरुवारी सेसाच्या ११ कामगारांना अटक केल्यानं डिचोली पोलीस स्थानकावर सुमारे साडेतीनशे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा जमाव केला. त्यामुळं पोलीस स्थानकावरही वातावरण तंग झालं. अटक केलेल्या कामगारांना त्वरित सोडावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

208
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close