MOBILE THIEF ARRESTED IN MAPUSA

Posted On April 10, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


मोबाईल चोराला रंगेहाथ पकडून दिला चोप
म्हापसा महारुद्र देवस्थानामागील प्रकार
संशयित सागर राठोड याला अटक

विदेशी पर्यटकांच्या हातातील महागडे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला स्थानिकांनी रंगेहाथ पकडून यथेच्छ चोप दिला, त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. सागर राठोड असं या संशयिताचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. म्हापशातील श्री महारुद्र देवस्थानांच्या पाठीमागील गल्लीत दोन विदेशी पर्यटक दुचाकीवर बसले होते. त्याचवेळी संशयित राठोड पाठीमागून धावत आला आणि त्यांच्या हातातील दोन मोबाईल घेऊन पुढे पळ काढला. यावेळी पर्यटकांनी आरडाओरड केल्यावर स्थानिकांनी चोरट्याला पकडून यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

201
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close