MONICA GHURDE’S MURDER DUE TO REVENGE : DIG

Posted On October 11, 2016 By In Crime, Local, People, Top Storiesमोनिकाची पॉर्न क्लिप बनवून करायचं होतं ब्लॅकमेल
संशयितानं कबुली दिल्याचा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा

परफ्युमरतज्ञ मोनिका घुर्डेची पॉर्न क्लिप बनवून, तिला ब्लेकमेल करण्याच्या हेतूनं संशयित राजकुमार सिंग तिच्या घरात घुसला; मात्र संशयिताच्या या कुकृत्यामुळं मोनिकाचा बळी गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत संशयित राजकुमारने मोनिका घुर्डे यांची कशी आत्महत्या केली त्याचा घटनाक्रम कथन केला. त्यानुसार,
१) आरोपी राजकुमारला कामावरून काढून टाकल्याचा राग होता. त्याचा बदला म्हणून तो तिच्या घरात घुसला.
२) तसंच आरोपीला घुर्डे यांची पॉर्न क्लिप बनवायची होती. ही क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल करण्याचा हेतू होता.
३) “मी तिला चाकूच्या धाकावर नग्न केलं”, अशी धक्कादायक कबुली राजकुमार दिला.
४) २१ वर्षीय राजकुमारला बेंगळुरूतून गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या गोवा पोलिसांच्या ताब्यात असून कसून चौकशी सुरू आहे.
५) राजकुमार चोरी करण्याच्या उद्देशानं घुरडेंच्या घरात घुसला होता. चाकूचा धाक दाखवून त्यानं घुरडे यांच्याकडून एटीएम व पिन नंबर घेतला.
६) त्यानंतर व्हिडिओ क्लिप बनवून ब्लॅकमेल करण्यासाठी त्यानं घुरडे यांचे कपडे काढले. त्यावेळी मोनिकाने आरडाओरड प्रतिकार केला असता त्यानं उशीच्या मदतीनं त्यांचं तोंड दाबलं. त्यावेळी मोनिका शांत झाली.
७) बेशुद्ध झाल्याचं समजून राजकुमार किचनमध्ये गेला. त्यानं तिथे दोन अंडी उकडून खाल्ली. अंडी खाऊन तो परत आला. तेव्हाही मोनिका त्याला बेशुद्धावस्थेतच दिसल्या. त्यावेळी आरोपीचा संशय आला की त्यांचा मृत्यू झाला आणि त्याने तिथून पळ काढला.

219
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close