Monika Ghurde Murder: Major Lapses in Police Investigation?

Posted On October 8, 2016 By In Crime, Top Stories

Monika Ghurde

मोनिका घुर्मे खून प्रकरणाचा तपास संदिग्ध
का सुटतात गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष?
तपासातील त्रुटीमुळं गुन्हेगार सुटतात निर्दोष
पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट

राज्यात मोठमोठे गुन्हे घडतात. पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात देखील. पुढे अनेकवर्षे खटला न्यायालयात चालतो अन शेवटी गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. त्यानंतर प्रकरणाचा तपास थांबतो. खरा गुन्हेगार काही सापडत नाही. अखेर असं का घडतं? असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा ‘इन गोवा’चा हा छोटासा प्रयत्न… सांगोल्डा इथं परफ्युमतज्ञ मोनिका घुर्डे हिच्या खूनाचा तपास ज्या पद्धतीनं पोलीस करताहेत, त्यातूनचं या प्रश्नाची उत्तर सहज मिळतील… काय आहे हा प्रकार… पहा इन गोवाचा खास रिपोर्ट….


सांगोल्डा इथं मोनिका घुर्डे या परफ्युमतज्ञ महिलेचा गूढरीत्या खून झाल्यानं शुक्रवारी या परिसरात खळबळ माजलीये. या प्रकरणातील खुन्यांचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके परराज्यात रवाना झालीयेत. पण तत्पूर्वी पोलीस अधिकारी गुप्ता यांनी पत्रकारांना खूनापूर्वीचा सांगितलेला घटनाक्रम मात्र चक्रावणाराआहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीत इन गोवाला आढळलेल्या त्रुटी आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. पोलिसांच्या याचं त्रुटींमुळे अनेक सराईत गुन्हेगार न्यायालयातून पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. काय आहेत या त्रुटी टाकूया एक नजर…

* त्रुटी क्रमांक एक

नियंत्रण कक्षातील पोलिसांना
माहिती नाहीत पोलीस हद्दी

मोनिकाच्या पतीला बोलावून फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर मोनिका मृतावस्थेत आढळली. त्यानंतर १०० नंबरवर नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षातून अकरा, सव्वा अकराच्या सुमारास पर्वरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पर्वरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना हा भाग साळगाव पोलीस हद्दीत येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ही हद्द नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती का?…

* त्रुटी क्रमांक दोन

तपास अधिकारी घटनास्थळावरून
घेतात अर्धवट माहिती

पर्वरी पोलिसांना नियंत्रण कक्षातून अकरा वाजता खुनाची माहिती मिळाली. नियंत्रण कक्षाला माहिती देण्याआधी घटनास्थळी मोनिकाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला होता. हा दरवाजा पोलिसांना माहिती मिळण्याआधी किती वेळापूर्वी उघडण्यात आला, याची माहिती पोलीस अधिकारी गुप्ता देऊ शकलेले नाहीत. कारणं ‘इन गोवा’कडे आठ वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची बातमी पोहोचली होती. म्हणजे त्याआधीचं हा दरवाजा उघडला होता. त्यामुळं ८ ते ११ असे तीन तास पोलिसांना का कळवण्यात आलं नाही?… कि… नियंत्रण कक्षाला माहिती मिळूनही त्यांनी पर्वरी पोलिसांना तीन तास उशिरा कळवलं? याविषयी पोलीस अधिकारी गुप्ता काहीही सांगू शकत नाहीत. म्हणजे दरवाजा उघडणाऱ्याकडून ही माहिती पोलीस घेऊ शकले असते, मात्र त्यांनी ही माहिती का घेतली नाही? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होताहे.

* त्रुटी क्रमांक तीन..

अर्धवट माहिती घेऊन
केली जाते तपासाची घाई

पोलीस अधिकारी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगार हे मोनिकाच्या ओळखीचे होते. ५ ऑक्टोबरच्या रात्री ७.३० वाजता मोनिकानं मुंबईत भावाशी फोनवरून संपर्क केला होता. त्यानंतर मोनिकाचा संपर्क तुटला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ६ ऑक्टोबरला पहाटे मोनिकाच्या एटीएम कार्डचा पर्वरीतील एका एटीएममध्ये वापर झाला आहे. म्हणजे गुन्हेगारांनी मध्यरात्रीच मोनिकाचा खून केला आणि पसार झाले. मोनिकाच्या फ्लॅटजवळ एकही एटीएम नाही. त्यासाठी बऱ्याच अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरचं यावं लागतं. म्हणजे गुन्हेगारांनी चारचाकी वाहनाचा वापर केला, असणार. या वाहनाची माहिती पोलिसांनी सुरक्षारक्षकाकडून घेतलीये का? अशा अनेक त्रुटी इन गोवाच्या नजरेस आल्या आहेत.

* आणि सर्वांत मोठे आश्चर्य म्हणजे मोनिका ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटच्या वर आणि आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये लोकं राहतात. खाली सुरक्षा रक्षक असतो. यातील कोणालाच या घटनेचा मागमूस लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाचा मृतदेह बेडवर पडलेला होता. त्याचे हातपाय दोरीनं बांधलेले होते. मानेवर झटपटीच्या खुणा आहेत. तिच्या तोंडात लाळ आणि फेस होता. या सर्व गोष्टी कोड्यात टाकणाऱ्या आहेत. कारणं जेव्हा मोनिकाचे हातपाय बांधून अत्याचार करण्यात आले तेव्हा, ती जरासुद्धा ओरडली नाही का?…

आरडाओरडा केला असल्यास… सुरक्षारक्षक आणि आजूबाजूच्या रहिवाशांना कसे समजले नाही? चला आणखी एक शक्यता असू शकते. अगोदर तिला बेशुद्ध केलं आणि मग तिच्यावर अत्याचार केले. पण बेशुद्ध व्यक्तीचे हातपाय बांधण्याचं कारणं काय ? दुसरी गोष्ट मानेवर झटापटीच्या खुणा आहेत. म्हणजे मोनिका तेव्हा शुद्धीवरचं होती. आता यातील गूढ शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरचं उलघडणार आहे. त्यामुळं सर्वांच्या नजरा शवचिकित्सा अहवालाकडे लागून राहिल्या आहेत.

229
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close