MPT AND COAST GUARD’S BOOMING OPERATION TO REDUCE OIL LEAKAGE FROM CRUISE LINER

Posted On July 4, 2016 By In Local, Top Stories


सहाराच्या बुडत्या जहाजाला सावरण्याचा प्रयत्न
जहाजातील इंधन पर्यावरणाला धोकादायक
तटरक्षक दलाकडून ‘बुमिंग ऑपरेशन’
इंधन काढणे शक्य न झाल्याने चिंता

मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीच्या यार्डात गेल्या बुधवारी सहारा इंडिया कंपनीच्या ‘एम. व्ही. क्विंग’ या जहाजामुळं समुद्रात झालेल्या इंधन गळतीचं रविवारी सकाळी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रहारी’ या जहाजातून ‘बुमिंग ऑपरेशन’ करण्यात आलं. यावेळी मुरगाव बंदराच्या समुद्रात इंधन गळतीमुळं झालेलं प्रदूषण थोपवण्यात आलं.
मागच्या बुधवारी मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डच्या धक्क्यावर सहारा इंडिया कंपनीचं ‘एमव्ही क्विंग’ जहाज पाणी आत शिरून एका बाजून कलून बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, एमपीटी आणि तटरक्षक दलाच्या धावपळीमुळं हे जहाज सावरण्यात यश आलं. सध्या हे जहाज धक्क्याला बांधून ठेवण्यात आल्यानं स्थिर आणि सुरक्षित राहिलंय; मात्र, हे जहाज समुद्राच्या तळाला लागलेले असून या जहाजात मोठय़ा प्रमाणात इंधन असल्यानं जहाजातून इंधन गळती होण्याचा धोका आहे.

गुरूवारपासून वाढता धोका लक्षात आल्यानं समुद्रातील प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून या जहाजातून सदर इंधनसाठा बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे काम संबंधित जहाज कंपनी करणार असून त्यांनी एका खासगी कंपनीकडे हे काम दिलेलं आहे; मात्र, गेले तीन दिवस जहाजातील इंधन खाली करण्याच्या कामाला सुरूवात करणे शक्य झालेले नाही. सध्या भारतीय तटरक्षक दलानं या जहाजावर लक्ष ठेवलंय.

एमपीटीही या जहाजाबाबत दक्षता बाळगून आहे. जहाजातील इंधनसाठा खाली करण्यास दिरंगाई झाल्यानं तटरक्षक दल, एमपीटी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची चिंता वाढलीये. इंधनसाठा बाहेर काढण्याची कामगीरी तातडीनं हाती घेतली गेली नसल्यानं जहाज कंपनीविरुद्ध सध्या नाराजी पसरलीये. तटरक्षक दलाचं ‘समुद्र प्रहरी’ हे जहाज सध्या जल प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्यास तोंड देण्यासाठी मुरगाव बंदरात सज्ज ठेवण्यात आलंय.

255
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close