Must watch !!! Exam Cheating Technology in Goa- Funny and Innovative

Posted On October 29, 2016 By In Top Stories, Uncategorized


 

विद्यार्थ्याने शोधून काढले परीक्षेत कॉपी करण्याचे हायटेक तंत्र
विद्यार्थ्याची चलाखी चाणाक्ष शिक्षकांनी पकडली
पेपर पॅडच्या मागच्या बाजूला सेट केला स्मार्टफोन

अभ्यासाचे कष्ट न घेता परीक्षेत चांगल्या मार्कानं पास होण्याची स्वप्न बघणारे आळशी विद्यार्थी कॉपीसारख्या दुष्प्रवृत्तीच्या आहारी जातात. बूटापासून पँटच्या शिलाईमध्ये ‘पुस्तकातील पानांचे तुकडे लपवणारे विद्यार्थी काही कमी नाहीत, पण जमाना हायटेक झालाय. त्यामुळं कॉप्याही हायटेक पद्धतीनं केल्या जाताहेत. असाच एक प्रकार शुक्रवारी ‘इन गोवा’च्या नजरेस आला. सध्या सहामाही परीक्षा चालू आहेत. या परीक्षेत एका ‘हुशार’ विद्यार्थ्यानं कॉपी करण्याची अभिनव पद्धत शोधून काढलीये. ही पद्धत पाहून तो विद्यार्थी किती हुशार आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. पण चाणाक्ष शिक्षकांनी ही कॉपी पकडली आणि सगळी पोलखोल झाली. काय आहे हा प्रकार, पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…

अनेक आळशी विद्यार्थी वर्षभर अभ्यासाचं ओझं मनावर घेत नाहीत; मात्र परीक्षा जवळ आली की घाम फुटतो. त्यांच्या मनावरचं ओझं वाढतं. अशा विद्यार्थ्यांना अभ्यास न करता परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचं असतं. असे विद्यार्थी मग अडकतात कॉपीच्या जाळ्यात…

पेपर पॅड आणि पेन या वस्तूंशिवाय परीक्षागृहात काहीही घेऊन जाता येत नाही. मगं काय करायचं? अशावेळी उत्तरांचे चिटोरे कागद अत्यंत गोपनीय पद्धतीने परीक्षागृहात नेण्याचे तंत्र विद्यार्थी शोधू लागतात. वर्गात कॉपी करताना निरीक्षकांनी पकडू नये म्हणून कॉपी करण्याची नवनवीन तंत्रे शोधून काढतात. पूर्वी कागदाच्या चिटोऱ्या लपवून परीक्षागृहात नेल्या जायच्या. आता जमाना बदललाय. त्यामुळं कॉपी करण्याचं तंत्रही बदलल्याचं इन गोवाच्या निदर्शनास आलं. एका विद्यार्थ्यानं अत्यंत अभिनव पद्धतीनं कॉपी केली. त्याची हुशारी पाहून तुम्हीही आवक व्हाल…

सध्या गोव्यात सहामाही परीक्षा चालू आहेत. या परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थ्यानं अँड्रॉईड फोनवरच पुस्तकातले उतारे उतरून घेतले आणि हा फोन अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीनं पेपर पॅडमध्ये लपवून ठेवला होता. तुम्ही बघू शकता, या पेपर पॅडवर चित्रविचित्र चित्रे आहेत. याच चित्रातील काही भाग अँड्रॉईड फोनच्या स्क्रीनवर सेव्ह केला होता. त्यामुळं फोनची स्क्रीन ही पेपर पॅडवरील चित्राचाच भाग असल्याचं भासत होतं. अखेर चालाख शिक्षकांनी कॉपी करण्याचं हे तंत्र शोधून त्या विद्यार्थ्याचा पेपर पॅड आणि अँड्रॉईड फोन जप्त केला.

खरोखर हीच हुशारी जर अभ्यासात दाखवली असती तर, आज या विद्यार्थ्याला शरमेन मान खाली घालावी लागली नसती. विद्यार्थ्यांनो तुमच्यातील हुशारी अशाप्रकारे वाया न घालवता अभ्यासाचे कष्ट घ्या आणि स्वाभिमानाने जगायला शिका, हेच इन गोवातर्फे तुम्हाला आवाहन.

278
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close