मुरगाव, सालसेतसाठी वेर्णात कचरा प्रकल्प उभारणार
वेर्णातील कचरा प्रकल्पावर अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च होणार
जनतेचे सहकार्य लाभल्यास २०१९मध्येच कचरामुक्त गोवा होईल
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ग्वाही
मुरगाव आणि सालसेतला कचरामुक्त करण्यासाठी वेर्णा इथं कचरा प्रकल्प उभारला जाईल. जनतेचे सहकार्य लाभल्यास २०१९ मध्येच संपूर्ण गोवा कचरामुक्त होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मडगावच्या कार्यक्रमात दिली.