NEW NOTES WORTH RS 24 LAKHS SEIZED IN KHOBRAWADO CALANGUTE

Posted On December 14, 2016 By In Crime, Local, People, Top Stories


खोब्रावाडोत २४ लाखांच्या नव्या नोट जप्त
नव्या दोन हजार रुपयांचा नोटा केल्या जप्त
तीन संशयितांना केले अटक; कळंगूट पोलिसांची कारवाई
कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देण्याचे धंदे तेजीत
पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची माहिती

चोर्ला घाटात ७० लाखांचे नवे चलन जप्त करण्याचा घटनेला २४ तास उलटले नाही, तोवर खोब्रावाडो कळंगूट इथून पोलिसांनी २००० हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. या नोटांचे एकूण मूल्य २४ लाख रुपये इतके आहे. याप्रकरणी कळंगूट पोलिसांनी तीन संशयितांना अटक केलीये. दरम्यान गेल्याच आठवड्यात पर्वरी आणि फोंड्यातून २००० हजार मूल्य असलेले सुमारे एक कोटी रुपये जप्त केले होते. त्यामुळं गोव्यात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची देवाण – घेवाण होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येताहे.

दरम्यान, म्हापसा भागात कमिशन घेऊन काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा तेजीत चालू असल्याचंही या घटनेतून उघड झालंय. कळंगूट पोलिसांनी पकडलेल्या संशयितानं पत्रकारांकडे पकडलेल्या पैशांबाबत खुलासा केला.

229
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close