New Traffic Signals Add to Driver Confusion in Goa

Posted On April 19, 2017 By In Special Stories, Top Stories


मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर ‘इन गोवा’ची कार्यवाही
पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीवर विशेष रिपोर्ट
पाच ‘ट्राफिक सिग्नल’ बसवलेत आडमुठ्या पद्धतीने’
‘ट्राफिक सिग्नल’मुळे वाहनचालकांचां होतोय गोंधळ
‘यू टर्न’साठी सिग्नल नसल्यामुळे गोंधळात भर
अभ्यासाविना बसवलेत ‘ट्राफिक सिग्नल’

राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवणक्षेत्राची माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पर्रीकर यांनी मंगळवारच्या बैठकीतून केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इन गोवा’नं बुधवारी पर्वरीतील महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक खात्यानं उभारलेले ‘ट्राफिक सिग्नल’च धोकादायक असल्याचं दिसून आलं. अतिशय आडमुठ्या पद्धतीनं या भागात ट्राफिक सिग्नल उभारून जनतेचे लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आलंय. त्यामुळं नुसते सीसीटीव्ही, अल्कोमीटर्ससारखी सामग्री खरेदी करून काही उपयोग नाही. असलेल्या यंत्रणा सुधारणे, त्यांची देखभाल दुरुस्ती करणे अत्यंत महत्त्वाचं बनल्याचं यातून स्पष्ट होतंय. आता ‘इन गोवा’च्या या विशेष वृत्ताची दखल मुख्यमंत्री पर्रीकर घेणार का? हे बघावं लागेल. कशी आहे ही वाहतूक व्यवस्था पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…

389
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close