Official Emblem launched for FIFA U-17 World Cup India 2017

Posted On September 28, 2016 By In Local, People, Sports, Top Storiesफीफा १७ वर्षांखालील विश्वचषक बोधचिन्हाचे अनावरण

‘फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक भारत २०१७’च्या स्थानिक समितीनं देशाच्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचं मंगळवारी अनावरण केलं. मॅरिट हॉटेलमध्ये झालेल्या या समारंभात केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, फीफाचे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो, आणि एलओसी आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

या बोधचिन्हात देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शवणारा भारती समुद्र, पिंपळाचे झाड, राष्ट्रीय ओळखीचा महत्त्वाचा भाग असलेल्या अशोक चिन्हाची आठवण करून देणारे पतंग आणि चक्र यांचा समावेश करण्यात आला आहे. बोधचिन्हाच्या पार्श्वभूमीत दाखवण्यात आलेला भारतीय समुद्र हा उपखंडांचा महत्त्वाचा भाग आहे. पिंपळाचं झाड भारताचं ‘राष्ट्रीय झाड’ असून त्याची मुळं देशाच्या संस्कृती आणि नीतीमूल्यांत खोलवर रुजलेली आहेत. देशभरातील ग्रामीण जनता महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याच्याच छत्राखाली एकत्र येते. पतंग हे स्वातंत्र्य आणि मजेचे प्रतीक आहे. मानचिन्हाच्या वरील बाजूस असलेले चक्र भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी संस्कृती देशात साजरे केले जाणारे उत्सव आणि आनंदाचे प्रतीक असून फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक हा ही उत्सवांच्या यादीत समाविष्ट झाल्याचे सुचवणारा आहे.

फुटबॉलमुळे देशात कशाप्रकारे उत्साह संचारला आहे, हे स्पष्ट दिसून येतं, असं फीफाचे अध्यक्ष जियानी इन्फन्टिनो यावेळी म्हणाले.

229
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close