OPPOSITION HEATS OUT AT GOA GOVT ; SAYS ” POWER HUNGRY BJP KILLING DEMOCRACY”

Posted On August 2, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


सभागृह चालवण्यात सभापतींना अपयश
विरोधकांनी दाखल केला अविश्वास ठराव
सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न गाळले जाताहेत
विरोधी सदस्यांचा घणाघाती आरोप

विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला हेतुपुरस्सर बगल दिली जात असल्याचा आरोप मंगळवारी विरोधकांनी पत्रकार परिषदेत केला. ‘वाणी एग्रो’ कंपनीला प्रोत्साहन मंडळानं मान्यता दिलीये. याविषयी विचारलेला प्रश्न चर्चेला येण्याआधीच ‘चर्चा झाल्या’च्या सदरात घालण्यात आला. त्यामुळं सभागृहातील वातावरण काहीकाळ तंग बनलं. हा प्रकार लोकशाहीला घातक असल्याची टीका विरोधकांनी केली.

दरम्यान, विद्यमान सभापतींना सभागृह चालवण्यात अपयश आल्यानं त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्याची माहिती विरोधकांनी यावेळी दिली.

259
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close