PANCHAYAT ELECTION PREPONED; LIKELY TO BE ON 17TH JUNE

Posted On April 24, 2017 By In Local, Politics, Top Stories


सांजावमुळे बदलली पंचायत निवडणुकीची तारीख
२५ जून ऐवजी १७ जूनला होणार निवडणूक
राज्य निवडणूक आयोगाला न विचारताच बदलली तारीख

दरवर्षी गोव्यात २५ जून रोजी ख्रिस्ती समाजाचा सांजव उत्सव आयोजित केला जातो. यंदा या उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे, २४ जून रोजी गोवा सरकारनं पंचायत निवडणूक जाहीर केल्यानं ख्रिस्ती बांधव नाराज बनले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं निवडणुकांची तारीख बदललीये. त्यामुळं ही निवडणूक आता १७ जून या दिवशी घेण्यात येणाराहे. ख्रिती समाजाच्या भावना मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नजरेस आणून देताचं त्यांनी त्वरित तारीख बदलली. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री मिकी पाशेको यांनीदेखील निवडणुकीच्या तारखेला आक्षेप घेतला होता. त्यामुळं सरकारला तारीख बदलणं भाग पडलं. आश्चर्य म्हणजे हा निर्णय घेताना राज्य निवडणूक आयोगाचा कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता.

226
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close