PANIC IN CITIZENS AS OVERNIGHT CHANGE IN CURRENCY OF RS 500 AND RS1000

Posted On November 9, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


५००, १०००च्या नोटा बदलल्यानं गोंधळ
बाजारपेठा, पेट्रोलपंपावर पेटले वाद
पर्यटकांनाही आर्थिक व्यवहार करताना बसला फटका
सरकारी कार्यालयातही ५००, १०००च्या नोटा नाकारल्या
आमदार कायतू यांनी विचारला जिल्हाधिकाऱ्यांना जाब

काळ्या पैसा आणि बनावट नोटांना चाफ लावण्यासाठी मोदी सरकारनं हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा वापरातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला; मात्र या ‘मास्टरस्ट्रोक’मुळं गोव्यातील पर्यटक आणि बाजारपेठांमध्ये गोंधळ उडालाय. एकंदरीत या निर्णयाचा गोव्याच्या आर्थिक उलाढालींवर मोठा परिणाम झालाय. इन गोवानं घेतलेला आढावा…
केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करताना या नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबर अशी दीर्घ मुदत दिलीये. म्हणजे ५० दिवसांत बॅंकांमध्ये जाऊन या नोटा बदलता येणाराहेत; मात्र काहीजणांच्या डोक्यावर आकाश कोसळल्यासारखी स्थिती झालीये. या नोटा बदलण्यासाठी बॅंकांमध्ये जाण्याऐवजी फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आणि रोजंदारीवर पोट भरणाऱ्या बूटपॉलिश करणाऱ्याकडे धाव घेतल्याचं उघड झालं. आता रोजंदारीवर पोट भरणारे व्यापारी पाचशे आणि हजारच्या नोटा सुट्या करून कशा देतील, याचा विचारदेखील समाजातील एक वर्ग करत नसल्याचं समोर आलं. म्हणजे समाजामध्ये परदु:ख शीतलता वाढत चाललीये असं या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतंय.

दरम्यान, चलन बदलाचा फटका सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांनाही बसला. मंगळवारी म्युटेशनच्या कामासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार कायतान सिल्वा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन जाब विचारला.
आमदार सिल्वा यांनी जाब विचारला असता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांनी केंद्र सरकारनं दिलेल्या आदेशाची प्रत दाखवली.

241
SHARES

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close