PARADE GROUND HOME FOR DEADLY DISEASES

Posted On June 22, 2016 By In Local, People, Top Stories


परेड मैदानावर जीवघेण्या आजारांची उत्पत्ती
आजूबाजूचे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
पणजी महापालिकेच्या कारभाराचा फटका
परेड मैदानावर साचले कचऱ्याचे ढीग
कचरातून झिरपतेये पावसाचे पाणी
रस्त्यांवर साचले कचरायुक्त पाण्याचे तळे
साचलेल्या पाण्यात होताहे डासांची पैदास

कांपाल पणजीतील परेड मैदान सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांचे माहेरघर ठरलं असून या प्रकारावर पणजीकरांनी जोरदार टीका केलीये.
सध्या पणजीचा कचरा परेड मैदानावर उघड्यावरचं टाकला जातो. या मैदानावर १५ ऑगस्टसारखा राष्ट्रीय सण साजरा केला जातो. या मैदानाच्या बाजूलाचं ‘कांपाल क्लिनिक, बालभवन, अग्निशामक दलाचे मुख्यालय तसंच खाजगी शाळा आहेत. या सर्वांनी पूर्वीचं मैदानावर कचरा टाकण्यास विरोध केला होता; मात्र महापालिकेनं मनमानी करत याचं ठिकाणी कचऱ्याच्या राशी लावल्याहेत. ही मनमानी करताना महापालिकेनं योग्य दक्षताही घेतली नाही. परिणामी पावसाचं पाणी कचऱ्यातून झिरपून आजूबाजूच्या परिसरात पसरलं. या पाण्याचा निचराही होत नसल्यानं मैदानाजवळच्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं. जागोजागी कचरायुक्त पाण्याची डबकी साचून राहिल्यानं स्थानिकांना प्रचंड त्रास होऊ लागलाय. स्थानिकांना याच डबक्यातून रस्ता शोधत मार्गक्रमण करावं लागताहे. आता या डबक्यांमध्ये डासांची पैदास होऊ लागली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांतून होताहे. हा प्रकार अत्यंत घातक आहे, अशी प्रतिक्रिया पणजी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये.

दरम्यान, शहाण्या राजकारण्यांची कमतरता नसताना पणजीत जनतेचं आरोग्य धोक्यात आल्याचा टोला डॉ. रीबोलो यांनी हाणलाय.

228
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close