PONDA SPORTS COMPLEX IN DISTRESS

Posted On July 10, 2016 By In Local, People, Top Stories


फोंड्यातील क्रीडा खात्याच्या मैदानाची दुर्दशा
ज्येष्ठांसाठी पदपथ नाही, विजेचीही सोय नाही
झाडेझुडपे वाढल्यानं चालणेही बनले कठीण
बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचीही झाली दुर्दशा
वीस वर्षांपूर्वी बांधले होते संकुल, छपर बनले गळके

क्रीडा खात्याच्या फोंड्यातील क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून, हे मैदान त्वरित दुरुस्त करावं, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केलीये. हे मैदान येत्या तीन महिन्यांत दुरुस्त केलं जाईल, असं आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिलंय.
फोंडा शहरातील एकमेव क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाल्यानं तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीये. तब्बल १७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ साली हे क्रीडामैदान सुसज्ज केलं होतं. त्यानंतर २००९ साली या मैदानाजवळच एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलही बांधण्यात आलं होतं; मात्र आता या दोन्ही मैदानांची दुरवस्था झालीये. संपूर्ण तालुक्यातील महत्त्वाचे सामने याच मैदानावर होतात. त्याशिवाय दररोज सुमारे साडेतीनशे ज्येष्ठ नागरिक या मैदनाचा वापर करत असतात; मात्र आता या मैदानावर चालन देखील कठीण बनल्याची माहिती इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी दिलीये.
फोंड्याच्या क्रीडा मैदानाची दुरवस्था झाली असताना दुसरीकडे इनडोअर क्रीडा संकुलाचीही दुर्दशा झालीये. या ठिकाणी क्रीडापटू कायम सराव करत असतात. या संकुलाच्या छतांना मोठी छिद्रे पडल्यानं पावसाचं पाणी आतमध्ये गळत असतं. त्यामुळं क्रीडापटूना सराव करणं कठीण बनलंय.

दरम्यान, हे मैदान येत्या तीन महिन्यांत दुरुस्त केलं जाईल, असं आश्वासन क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी दिलंय.

207
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close