‘फुटबॉल भक्ताचा ‘फिव्हर’
श्री सिद्धेश्वराच्या मूर्तीला घातला ‘क्रॉस’
उगे गावात निर्माण झाला तणाव
पोर्तुगालने युरो चषक पटकावल्याचा झाला उन्माद
संशयित लुकास कार्व्हालो पोलिसांच्या ताब्यात
घटनेमुळे देवाचे पावित्र्य भंग झाल्याचा देवस्थान समितीचा दावा
फ्रान्सवर ऐतिहासिक मात करोत पोर्तुगालनं युरो चषक पटकावल्यावर एका ‘फुटबॉल भक्ता’नं उगेतील श्री सिद्धेश्वर देवाच्या मूर्तीवर क्रॉस घातला. या प्रकारानं सोमवारी सांगे भागात खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन लुकास कार्व्हालो या संशयित युवकाला अटक केली असता, त्यानं या कृत्याची कबुली दिली आणि तणाव निवळला. दरम्यान, या युवकाला कोणी फूस लावून हे कृत्य करायला लावलं का? याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केलीये.