POTHOLE SAGA CONTINUES IN MAPUSA

Posted On July 20, 2017 By In Local, People, Top Stories


सर आली धावून… रस्ता गेला वाहून….
म्हापशातील रस्त्यांना पुन्हा पडले खड्डे
बुजवलेल्या खड्डयांमधील खडी गेली वाहून
खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत चालवावी लागताहेत वाहने

म्हापसा इथं पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोडून ठेवलेल्या रस्त्यांमुळं म्हापसेकरांना आता मोठा मन:स्ताप सहन करावा लागताहे. इन गोवानं पाऊस सुरू होण्यापूर्वीच म्हापसेकरांना सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर काही भागातील रस्त्यांवर प्रशासनानं खडी टाकून वरवरची मलमपट्टी केली होती; मात्र दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात खड्ड्यात भरलेली सर्व खडी वाहून गेल्यानं रस्त्यांमध्ये पूर्ववत खड्डे तयार झालेत. या खड्डयांमुळे आता शहरात वाहन चालवणे मुश्कील बनलंय. या खड्डयांमध्ये रस्ता शोधत वाहने चालवली लागताहेत. परिणामी काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागलीये.

202
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close