RISE IN PETROL PRICES BY 1.23 RUPEES

Posted On June 1, 2017 By In Local, People, Top Stories


पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
पेट्रोलचे दर १ रुपया २३ पैशांनी महाग
डिझेलच्या दरांमध्ये ८९ पैशांनी वाढले

पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपया २३ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर ८९ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.

206
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close