Road Romeo Punished by mob

Posted On June 17, 2016 By In Crime, Local, People, Top Stories


युवतीच्या पालकांनी दिला रोमिओला चोप
वर्षभरापासून युवतीचा करत होता पाठलाग
कुटुंबियांना देत होता जीवे मारण्याची धमकी
अनेकदा समज देऊनही रोमिओची चालू होती अरेरावी
चोप दिल्यानंतर रोमिओला केले पोलिसांच्या स्वाधीन

वर्षभरापासून युवतीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला युवतीच्या पालकांनी गुरुवारी यथेच्छ चोप दिला. त्यानंतर त्याला पर्वरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. आश्चर्य म्हणजे या रोडरोमिओनं यापूर्वी चार वेळ तुरुंगाची हवा खाल्लीये, तरीदेखील त्याला आक्कल आली नाही. त्यामुळं युवतीच्या पालकांच्या संयमाचा बांध फुटला.
पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये महिलांना रस्त्यावरून फिरणं कठीण बनलंय. एकटी-दुकटी महिला दिसली कि वासनांध नराधम त्यांचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेले असतात. त्यांच्यापासून स्वत:ला वाचण्यासाठी तिथल्या महिलांना मोठी कसरत करावी लागते. ही परिस्थिती आत गोव्यातील महिलांवर येऊन ठेपलीये. याचा प्रत्यय पर्वरीतील एका युवतीनं घेतलाय. गेल्या एक वर्षापासून एका रोडरोमीओनं त्या युवतीचं जगणं कठीण केलं होतं. सतत फोनवरून तिची छेड काढत होता.

या युवतीचा नाद सोडून द्यावा, यासाठी तिच्या आईवडिलांनी त्या रोमिओच्या पाया पडले, तरी त्याच्यावर काहीही फरक पडला नाही. शेवटी या मुलीनं पोलिसांकडे रक्षणाची भिक मागितली, मात्र त्यांनी कोणतीही मदत देण्यास असमर्थता दर्शवली. यामुळं त्या रोमिओला चेव चढला. त्यानं एकदा त्या युवतीचं बांबोळी इथून अपहरण करून जंगलात बंदी बनवून ठेवलं आणि तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युवतीनं कशीबशी सुटका करून पोलीस स्थानक गाठलं. मग पोलिसांनी त्याला अटक करून एक महिना कारावासात ठेवलं. या दरम्यान, सदर प्रकाराला कंटाळून युवतीनं विष प्राशन केलं होतं. दीड महिना तिच्यावर उपचार करून, तिला वाचवण्यात आलं होतं. कारागृहातून सुटल्यावर त्या रोमिओनं पुन्हा त्या युवतीला छेडण्यास सुरुवात केली.

त्यामुळं युवतीचा आणि तिच्या पालकांच्या संयमाचा बांध फुटला. पोलीस कायद्यानं रक्षण देत नसल्यानं ती युवती आणि तिच्या आईनं रणरागिणीचा अवतार धारण करून गुरुवारी त्या युवकाला अद्दल घडवली. या युवकाची भर रस्त्यात यथेच्छ धुलाई केल्यावर, मग कायद्याचे रक्षक तिथं धावून आले. त्यांनी युवकाला ताब्यात घेतलं. या प्रकारामुळं पोलिस जनतेचे रक्षण करण्यात खरोखरचं अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालंय.

196
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close