SANGH WAPASI OF VELINGKAR !

Posted On February 27, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


सुभाष वेलिंगकर ४ मार्चला करणार संघवापसी
वेलिंगकर यांच्या संघवापसी राजकीय वर्तुळात माजली खळबळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बंडखोरी करत ‘गोवा सुरक्षा मंच’ची स्थापना करून विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार आव्हान दिलेल्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आता मतदान झाल्यावर लगेच पुन्हा संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी झळकल्यानं सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या बातमीनुसार सुभाष वेलिंगकर हे येत्या ४ मार्च रोजी म्हणजे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच संघवापसी करणार आहेत, मात्र अजून यावर अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती वेलिंगकर यांनी दिलीये.

भाषा माध्यम प्रश्नावर भाजपनं इंग्रजीला अनुदान देण्याचा ठेका कायम ठेवल्यानं भारतीय भाषा सुरक्षा मंचनं भाजपचा पाडाव करण्यासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. या मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी ‘गोवा सुरक्षा मंच’ स्थापन करून भाजपला कडवं आव्हान देतानाचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला भाजपशी असलेली युती तोडण्यास भाग पडलं. सुभाष वेलिंगकर यांनी ज्यावेळी पक्षाची स्थापना केली, त्यावेळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रांताचे संघचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कृतीची दखल घेत, नागपूर स्वयंसेवक संघानं त्यांना काढून टाकलं. त्यामुळं संघ अंगात मुरलेल्या वेलिंगकर यांनी बंडखोरी करत स्वत:चा गोवा संघ स्थापन केला. वेलिंगकर यांनी तत्वाशी दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे भाषाप्रेम पाहून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षदेखील भारावून गेला. वेलिंगकर यांनी मगोला भाजपशी युती तोडण्यासाठी दबाबतंत्राचा पुरेपूर वापर केला. मगोनं देखील वेलिंगकर यांची हाक ऐकून भाजपशी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. आता या निवडणुकीचा निकाल अजून लागलेला नाहीत, तोच वेलिंगकर पुन्हा संघात जाण्याची बातमी येऊन थडकल्यानं चर्चेला ऊत आलाय.

198
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close