SBICap, bidders begin inspection process of Mallya’s Kingfisher villa

Posted On September 26, 2016 By In Local, National News, People, Top Storiesबोली सुरू… ८५ करोड एक !… ८५ करोड दोन !…
‘किंगफिशर व्हिला’चा होणार लिलाव
भारतीय स्टेट बँकनं सुरू केली प्रक्रिया
बोलीदारांना पाहणी करण्यास बंगला केला खुला
कडक बंदोबस्तात ‘के व्हिला’ची पाहणी सुरू

कांदोळीतील विजय मल्ल्या यांच्या प्रसिद्ध ‘किंगफिशर व्हिला’ बंगल्याचा लिलाव करण्याचं भारतीय स्टेट बँकनं निश्चित केल्यानं सोमवारी हा बंगला बोलीदारांच्या पाहणीसाठी खुला करण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही पाहणी २७ सप्टेंबर तसंच ५ आणि ६ ऑक्टोबर असे आणखी तीन दिवस चालनाराहे. त्यानंतर व्हीलाचा लिलाव केला जाईल. तूर्तास भारतीय स्टेट बँकनं या बंगल्याची न्यूनतम राखीव किंमत ८५ कोटी रुपये अशी जाहीर केलीये.

उत्तर गोव्यात कांदोळी इथं विजय मल्ल्या यांचा बंगला सुमारे १२ हजार ३५० चौरस मीटर जागेत विस्तारलाय. या बंगल्यात तीन मोठे शयनकक्ष आणि भव्य हॉल आहेत. त्यात शिसम लाकडाचे गोमंतकीय शैलीतील अप्रतिम कोरीवकाम करण्यात आलं. हे कोरीवकाम सुप्रसिद्ध गोमंतकीय वास्तुशिल्पकार डीन डिक्रूज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय. याशिवाय मल्ल्या यांच्या मालकीच्या अनेक भपकेबाज गाड्या, खासगी जेट विमान, असंख्य ब्रँड आणि ट्रेडमार्कसही विक्रीला काढण्यात येणाराहेत.

मल्ल्या यांनी सुमारे १७ विविध बँकाकडून ६ हजार ९६३ कोटींचे कर्ज घेतलं होतं. मल्ल्या यांनी कर्ज थकविल्यानं गेल्या मे महिन्यात ‘भारतीय स्टेट बँके’ने हा किंगफिशर व्हिला ताब्यात घेतला. ‘युनायटेड ब्रेवरेजीस’ या कंपनीच्या मालिकीचा हा व्हिला होता. उत्तर गोव्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी आदेश दिल्यानंतर बँकेने या व्हिलाचा ताबा घेतला होता.

त्याआधी कूळ हक्काचा दावा करुन तो ताब्यात देण्यास कंपनीनं नकार दिला होता. १२ मे रोजी अखेर बँकेनं त्यावर ताबा मिळवण्यात यश मिळवलं; मात्र यामध्ये ‘युनाटेड ब्रेवरेजीस’नं हिस्सा असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार २० दिवसांत व्हिलाची विभागणी करण्याचा आदेश न्यायालयानं दिलाय. त्यामुळं न्यायप्रक्रियेत अडकलेला हा बंगाल घेण्यास कोण पुढे येतो? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

दरम्यान, मल्ल्या यांनी देणे थकवलेल्या सर्व बँकांनी ‘एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनी’ला कांदोळीच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा अधिकार दिला होता. या कंपनीने सदर बंगल्याची खरेदीदारांना पाहणी करण्यासाठी २६ आणि २७ सप्टेंबर तसंच५ आणि ६ ऑक्टोबर अशा दोन तारखा ठेवल्या आहेत. मल्ल्या सध्या विदेशात असून त्यांच्यावर फसवणुकीबाबत गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ‘भारतीय कर्ज वसुली लवादा’नं वसुलीचा अहवाल २८ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचा आदेश वसुली अधिकाऱ्यांना दिलाय.
….

दरम्यान, सोमवारी या बंगल्याचं प्रवेशद्वार खरीददारांसाठी उघडण्यात आलं; मात्र प्रसारमाध्यमांना प्रवेशद्वारासमोर उभं राहण्यास सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. चित्रीकरण करणाऱ्या मीडियाच्या कॅमेरामननादेखील कॅमेरे बंद करण्याची बळजोरी सुरक्षा रक्षकांनी केली. सकाळच्या वेळेत एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याचं प्रवेशद्वार उघडलं, पण दुपारपर्यंत एकही खरेदीदार बंगल्यात पोहोचला नव्हता. आता उरलेल्या तीन दिवसांत कोणी खरेदीदार इथं येतो का? हे बघावं लागेल.

245
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close