कळंगूट, बागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वाकडे
प्रकल्पाला जमिनी दिलेल्या मालकांसाठी निधी मंजूर
उपसभापती मायकल लोबो यांची माहिती
कळंगूट आणि बागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा दिलेल्या जमीन मालकांना सरकारनं भरपाईपोटी सुमारे १२ लाख रुपये मंजूर केलेत. जमीनमालकांनी दस्तऐवज दाखवून आपली भरपाई घ्यावी, असं आवाहन उपसभापती मायकल लोबो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलं. त्याचबरोबर कांदोळीतही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय पंचायतीनं घेतलाय. याची निविदा प्रक्रिया चालू झाल्याची माहिती लोबो यांनी यावेळी दिली.