SHASTRA PUJA AND EXHIBITION AT MAPUSA

Posted On October 11, 2016 By In Local, People, Top Storiesम्हापशात दुर्मिळ शस्त्रांचे पूजन, प्रदर्शन
एके ४७ पाहण्याची मिळाली नागरिकांना संधी

राष्ट्रहित मंच म्हापसातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी पोलिस स्थानकाच्या सभागृहात दुर्मिळ शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. यामध्ये पहिल्यांदाचं ‘एके ४७’ पाहण्याची संधी गोवेकरांना लाभली. सकाळी शस्त्रपूजा झाल्यावर शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन दुपारी १ वाजेपर्यंत लोकांसाठी खुलं होतं.

म्हापसा इथं मंगळवारी झालेल्या शस्त्र प्रदर्शनात सुमारे १५० परवानाधारकांची, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर शस्त्रांमध्ये प्राचीन काळी युद्धात वापरल्या गेलेल्या तलवारी, ढाली, भाले तसंच आधुनिक काळातील बंदूका, पिस्तूले प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये १८ व्या शतकापासूनची वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली होती. यातील प्रत्येक हत्याराला ऐतिहासिक महत्त्व आहे. हत्यारे कशी तयार होतात, याची माहितीही प्रदर्शनात देण्यात आली. १९८३-८४ सालापासून शस्त्रांची आयात बंद झाली. त्यामुळं प्रदर्शनात १९८३-८४ सालापूर्वी उत्पादित करण्यात आलेली शस्त्रे लोकांना पाहायला मिळाली. या प्रदर्शनात पोलिस वापरीत असलेल्या शस्त्रांचाही वेगळा काऊंटर उभारण्यात आला होता. या काऊटरवर ‘एके ४७’ रायफल लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी सीडीद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या अमेरिकन शस्त्रांचे प्रदर्शन दाखवण्यात आले.

या प्रदर्शनात एका राजस्थानी व्यक्तीनं सुमारे दोनशे वर्षे जुनी तलवार आणली होती. पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी ही तलवार गोव्यात आणली. पूर्वी गावांवर दरोडे पडायचे. त्यावेळी संरक्षणासाठी ते या तलवारींचा उपयोग करायचे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

207
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close