SHIP BREAKERS SUCCEED IN CUTTING BHAGEERATH PONTOON

Posted On June 25, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


भगीरथ प्रयत्न करून ‘भगीरथ’ हटवले
आरोसी समुद्र किनाऱ्यावर रुतले होते जहाज

कासावली पंचायत क्षेत्रातील आरोसी समुद्र किनाऱ्यावर रूतलेलं ‘भगिरथ’ जहाज अखेर शनिवारी ‘अरिहंत शिप ब्रेकर्स’ या कंपनीनं हटवलं. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ हे जहाज रूतलेल्यानं स्थानिकांनी आंदोलन छेडलं होतं.
कासावली पंचायत क्षेत्रातील एका हॉटेल व्यवस्थापनानं ‘भगिरथ’ या जहाजावर लग्न समारंभ आयोजित केला होता. जहाज खूप जुनं असल्यानं लाटांच्या जोरदार माऱ्यामुळं ते समुद्रात आरोसी समुद्र किनाऱ्यावर रूतलं होतं. या जहाजाला टगद्वारे ओढून नेण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानं शेवटी हे जहाज कापून त्याची विल्हेवाट लावावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार अरिहंत शिप ब्रेकर्स’ या कंपनीनं यंत्रणा आणून युद्धपातळीवर हे जहाज कापून बाजूला हटवलं.

233
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close