SHIVSENA MP SANJAY RAUTS GUIDANCE FOR GOA SHIVASAINIK

Posted On June 6, 2016 By In Local, Politics, Top Stories


शब्दांना धार आणि टीकेला उत्तर द्या
खासदार राउत यांचे राज्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन

राज्य सरकारवर गोवेकर जनता प्रचंड नाराज आहे. सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंगच झाला असून काँग्रेस तर येथे औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. अशा स्थितीत गोव्यातील जनतेसमोर शिवसेना हाच भक्कम पर्याय असल्याचे सांगून खासदार राऊत म्हणाले, निवडणुकीपूर्वी कुणाशी युती करायची याचा सध्या तरी विचार नसला तरी निवडणुकीनंतर मात्र समविचारी पक्षांशी युती करण्याचा मार्ग मोकळा असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी याबाबत निर्णय जाहीर करतील असे राऊत म्हणाले. परकीय शक्तींच्या विळख्यात गोवा गोवा राज्य परकीय शक्तींच्या विळख्यात सापडले आहे. रशियन आणि नायजेरियन ड्रग्ज माफियांनी येथे उच्छाद मांडला आहे. शिवसेना या माफियांचा बीमोड करेल असे आश्‍वासन राऊत यांनी दिले. येथील भाजप सरकारला ड्रग्ज माफियांना रोखता आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

223
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close