SMART CITY MISSION LAUNCH

Posted On June 25, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


स्मार्ट सिटी योजनेचं थाटात उद्घाटन
पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा होणार विकास
पुण्यात रंगला उद्घाटन सोहळा
पणजीतून भाजप सरकारनं दाखवला सहभाग

मोदी सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन शनिवारी पुण्यातून करण्यात आलं. योजनेच्या पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा समावेश आहे. पणजी शहराचा नंबर दुसऱ्या टप्प्यात असला तरी या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पणजीतही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन शनिवारी पुण्यातून करण्यात आलं. या सिटीमध्ये पहिल्या टप्प्यात वीस शहरांचा समावेश आहे. स्मार्ट सिटीमध्ये घरगुती सिलिंडरऐवजी पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्यात येणार आहे. ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बिल हे ऑनलाईन भरण्याची सुविधा दिले जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी उद्याने उभारले जाणार. बेरोजगार तरूणांना नोकरीच्या संधी त्यांच्या मोबाईलवर कळविण्यात येणार आहे. तसेच अनेक ठिकाणी वायफायची सुविधा उपलब्ध असेल. विविध शहरात उद्योजकांना आकर्षित करून कारखाने उभा करण्यात येणार आहे.

एकाच ठिकाणी ट्राफिक झाल्यास दुसरा मार्ग निवडण्यासाठी सूचना मिळेल. एकादा गुन्हेगार रस्त्यावर आल्यास विशिष्ट ठिकाणी अलार्म वाजेल. सिंगापूरप्रमाणे येथील कचऱयांच्या पेटय़ांवर जीपीएसद्वारे देखरेख केली जाणार. तसेच पिण्याचे पाणी योग्यरितीने पुरवण्याची योजना आहे. यांसह अन्य सुविधा स्मार्ट सिटीत येणार आहे.

भुवनेश्वर, पुणे, जयपुर, सूरत, कोचि, अहमदाबाद, जबलपुर, विशाखापट्टनम, सोलापूर, डावंगेरे, इंदूर, न्यू दिल्ली, कोईमत्तूर, ककिनाडा, बेलगाव, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना आणि भोपाळ या वीस शहरांचा समावेश पहिल्या टप्प्या आहेत.

195
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close