[STING OPERATION] HIGH VOLTAGE CORRUPTION IN ELECTRICITY DEPARTMENT!

Posted On June 6, 2017 By In Crime, Special Stories, Top Stories


वीज खात्यातीला ‘हाय व्होल्टेज’ भ्रष्टाचाराचा पर्दाफाश
सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ अधिकाऱ्यांनी फासला काळीमा
कुठ्ठाळीतील वीज कार्यालयातील भ्रष्टाचाराला ऊत
हे सरकारी अधिकारी आहेत की सरकारमान्य लुटारू?
वीज जोडणीसाठी घेतात ३ हजार रुपयांची लाच
सामान्य नागरिकाने भ्रष्ट अधिकाऱ्याचा कारनामा केला कॅमेरात कैद
भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याची घोषणा करणारे सरकार काय करणार?

नव्यानं सत्तेत आलेल्या भाजपप्रणीत सरकारनं भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी प्रशासकीय खात्यात भ्रष्टाचार किती खोलवर रुजलाय, याचा प्रत्यय देणारी घटना पुन्हा एकदा समोर आलीये. अंगाअंगात भ्रष्टाचार मुरलेले प्रशासकीय अधिकारी सामान्य नागरिकांनी कशी लूट करत आहेत, याचा पर्दापाश करणारा व्हीडीओ ‘इन गोवा’च्या हाती लागलाय. हे प्रकरण आहे वीज खात्यातील. कुठ्ठाळीतील वीज कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी जनतेला बिनधास्त लुबाडत असून एका नागरिकानं हे सर्व प्रकरण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केलंय. काय आहे हा प्रकार पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…

voice over
गोव्यात आणि केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराचं उच्चाटन झाल्याचा दावा नेहमीच भाजप नेत्यांकडून केला जातो. या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना ‘इन गोवा’ आता तुमच्यासमोर घेऊन येताहेत. सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’च्या घोषणेला खुद्द प्रशासकीय अधिकारी कसा काळीमा फासत आहेत, हे आम्ही तुम्हाला दाखवणाराहोत. हा प्रकार आहे वास्को – कुठ्ठाळीच्या वीज कार्यालयातील. हे कार्यालय म्हणजे सध्या भ्रष्टाचाराचं कुरण बनल्याचा आरोप इथल्या नागरिकांमधून वारंवार होत असतो. या आरोपाला पुष्टी देणारा व्हीडीओ नुकताच व्हायरल झालाय. हा सर्व प्रकार एका जागरूक नागरिकानं आपल्या कॅमेरात कैद केलाय. या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी आकंठ भ्रष्टाचारात बुडालेत. हे अधिकारी वीज जोडणीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांकडून कसे पैसे उकळत आहेत, हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. जरा हा व्हीडीओ नीट बघा…

कुठ्ठाळी वीज कार्यालयातील अधिकाऱ्याचा हा व्हीडीओ आहे. या अधिकाऱ्यानं वीज जोडणीसाठी एका गरीब नागरिकाकडून चक्क १७ हजार रुपये उकळले आहेत. यातील दोन हजार रुपयांची त्याने लाच घेतलीये. शिवाय आणखी एक हजार रुपये नंतर आणून देण्याचा दबाव हा अधिकारी नागरिकावर घालताना दिसत आहे. तुम्ही ऐकलं असेल हा अधिकारी काय म्हणतो ते… ‘मला खूष कर, मला ३ हजार रुपये दे.’ यावर तो नागरिक विनंती करतो, “मी गरीब आहे, इतके पैसे कुठून आणू.” मात्र भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या या अधिकाऱ्याला त्याची जराही कणव येत नाही. पुन्हा एकदा हा व्हीडीओ नीट पहा… हा अधिकारी केवळ ६ हजार रुपयांची पावती देणार आहे, मग वरचे ११ हजार रुपये कशासाठी आकारले आणि त्याला खूष करण्यासाठी ३ हजार रुपये का द्यायचे? सरकार त्याला पगार देत नाही का?… काय आहे हा प्रकार पुन्हा एकदा पहा…

कुठ्ठाळी वीज कार्यालयातील केवळ हा अधिकारीच भ्रष्ट आहे, असे नाही. इथले सर्वच कर्मचारी भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत. हा प्रकार खुद्द या अधिकाऱ्यानंच उघड केलाय. मला ३ हजार रुपये द्यावे लागतात, जरा हे वाक्य नीट ऐका… या अधिकाऱ्याला खूष करण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागता, ही बाब या कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना माहिती आहे… जरा ऐका.

तर तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे हा अधिकारी भ्रष्टाचार करत असताना इतर कर्मचारी त्याला मूकसंमती देत आहेत. एकंदरीत या कार्यालयात सरकारमान्य लुटारू जनतेला बिनबोभाटपणे लुटत आहेत. आता भ्रष्टाचार निर्मूलनाचं आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार या भ्रष्टाचाऱ्यांची नांगी ठेचणार का? असा प्रश्न गोवेकरांमधून विचारला जातोय.

500
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close