SURENDRA FURTADO ELECTED PANJIM MAYOR ONCE AGAIN

Posted On March 15, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


मनपाच्या महपौरपदी पुन्हा सुरेंद्र फुर्तादो
उपमहापौरपदी लता पारेख यांची निवड

पणजी महानगर पालिकेच्या महापौरपदी पुन्हा एकदा सुरेंद्र फुर्तादो यांनी निवड झाली असून, उपमहपौर पदी लता पारेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर पदासाठी मोन्सेरात गटातर्फे फुर्तादो यांनी तर भाजप गटातर्फे रुपेश हळर्णकर यांनी अर्ज भरले होते. तर उपमहापौर पदासाठी मोन्सेरात गटाच्या लता पारेख यांचा एकमेव अर्ज आला होता. यामध्ये महापौर पदी हळर्णकर यांच्यावर मत करून पुन्हा फुर्तादो यांनी मोहोर उमटवली.

पणजी महानगर पालिकेच्या महपौर आणि उपमहापौर पदासाठी बुधवारी मतदान घेण्यात आलं. महापौर पदासाठी बाबुश मोन्सेरात गटातर्फे सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. तर भाजप गटातर्फे रुपेश हळर्णकर यांनी अर्ज सादर केला होता. तर उपमहापौर पदासाठी केवळ मोन्सेरात गटातर्फे लता पारेख यांनी अर्ज भरला होता. बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी या पदांसाठी मतदान घेतलं. यात पुन्हा फुर्तादो यांचीच महापौर पदासाठी निवड झाली. दरम्यान, उपमहपौर पदासाठी भाजप गटातर्फे एकही अर्ज दाखल न झाल्यानं पारेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महापौर आणि उपमहपौर पदासाठी दरवर्षी निवडणूक घेतली जाते. महापालिका मंडळाच्या मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात गटाचे १७ आणि भाजप गटाचे १३ उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर फुर्तादो यांची महपौरपदी तर लता पारेख यांची उपमहापौरपदी निवड झाली होती. यंदाही त्यांचीच वर्णी लागल्यानं मोन्सेरात गटात आनंदी आनंद दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत बाबुश मोन्सेरात हे पणजी मतदारसंघातून अवघ्या एक हजार मतांनी हारले होते. त्यामुळं महपौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. या निवडीत महापालिकेवर आपली पकड मजबूत असल्याचं मोन्सेरात यांनी सिद्ध केलं.

219
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close