BJP Tag

भाजप – मगो युतीबाबतचे गूढ अजूनही कायम मगोची महत्त्वपूर्ण बैठक पणजीत संपन्न युतीबाबतचे गूढ १६ डिसेंबर रोजी उलगडणार बाष्पकमंत्री दीपक ढवळीकर यांची पत्रकारांना माहिती प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाला मगोचा विरोध मुख्यमंत्रीपदावर पार्सेकर नकोच : मगोचा नवा सूर मगोच्या प्रचाराचा नारळ ११ रोजी फुटणार म्हार्दोळच्या श्री महालसा देवीला नारळ वढवून प्रचाराचा शुभारंभ आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की तोडायची यावर गुरुवारी मगोच्या केंद्रीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यानं युतीबाबतचं गूढ अजून कायम आहे. दरम्यान, यापुढे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकरRead More
वेलिंगकर यांच्या विरोधात भाजपची गुपचूप लढाई विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारिणीतून काढण्यासाठी रचलाय कट संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांनी कट रचल्याचा वेलिंगकर यांचा आरोप भाजपला जड झालेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांना नामोहरम करण्यासाठी गुप्तपणे कटकारस्थाने रचली जात असल्याचा घणाघाती आरोप खुद्द वेलिंगकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेलिंगकर हे पर्वरीतील विद्याप्रबोधिनी संस्थेचे सचिव आहेत. या पदावरून हटवण्यासाठी संस्थेच्या ३२ सदस्यांनी प्रयत्न सुरू केलेत. यामागे खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हात असल्याचा आरोपही वेलिंगकर यांनी यावेळी केलाRead More
मोदींचा चलन बदलातील निर्णय स्वागतार्ह भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडूलकर यांनी केले अभिनंदन भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी मोदी सरकारनं चलनात बदल करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तंडुलकर यांनी व्यक्त केलीये. या निर्णयामुळ सामान्य जनतेला काहीसा त्रास सहन करावा लागेल, मात्र हा निर्णय फायदेशीर ठरेल, असा विश्वास तेंडुलकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.Read More
‘वन रँक वन पेन्शन’ योजनेला भाजपने दिली चालना २० लाख ६९ निवृत्त सैनिकांना योजनेचा लाभ संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा दावा ‘वन रँक वन पेन्शन’ योजना ४३ वर्षे धूळ खात पडली होती. त्याच्यावर अनेकांनी भाषणे झोडली, पण मोदी सरकारने या योजनेला चालना दिली. आतापर्यंत २० लाख ६९ हजार निवृत्त सैनिकांना याचा लाभ झाला, असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला.Read More
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी कॉंग्रेसची उडवली खिल्ली स्वत:चे आमदार सांभाळू न शकणारे इतरांवर करताहेत आरोप कॉंग्रेसला गोवेकरांनी पुरेपूर ओळखले आहे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची प्रतिक्रिया ज्या पक्षाला स्वत:चे आमदार सांभाळण्याची क्षमता नाही, त्यांनी भाजपवर आरोप ठेवणे हस्यास्पद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी पत्रकारांकडे व्यक्त केली.Read More

Posted On October 6, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

BJP MAHILA DEFENDS LAADLI LAXMI SCHEME

कॉंग्रेस नेत्या कुतिन्हो यांची ‘लाडली लक्ष्मी’वर टीका भाजप महिला मोर्चानं कुतिन्हो यांच्यावर डागली तोफ कॉंग्रेस नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजप सरकारच्या ‘लाडली लक्ष्मी योजने’वर टीका केल्यानं भाजपच्या महिला मोर्चानं त्यांचा निषेध केला. या योजनेमुळं अनेक मुलींच्या पालकांना फायदा झालाय. त्यामुळं कुतिन्हो यांनी चांगल्या योजनेवर टीका करू नये, असा इशारा मोर्चाच्या नेत्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, योजनेच्या नियमांमध्ये काही त्रुटी असल्यास सरकारशी चर्चा करून त्या दूर केल्या जातील, असं आश्वासनं भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षांनी यावेळी दिलं.Read More
मगोशी युती करूनचं भाजपचे नवे सरकार स्थापन होईल द. गो. खासदार नरेंद्र सावईकर यांचा स्पष्ट निर्वाळा गोवा सुरक्षा मंच पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यात युतीबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी भाजपनं मगोशी युती कायम असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलाय. भाजपचे प्रवक्ते तथा खासदार नरेंद्र सावईकर यांनी भाजप मगोला घेऊनचं सरकार स्थापन करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केलाय.Read More

Posted On October 3, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

DEFENCE MINISTERS GOA TOUR POSTPONED

संरक्षणमंत्र्यांचा अभिनंदन कार्यक्रम पुढे ढकलला अतिमहत्त्वाच्या बैठकीमुळं संरक्षणमंत्र्यांचा गोवा दौरा रद्द संरक्षणमंत्र्यांचा सत्कार नव्हे, केवळ अभिनंदन करणार प्रवक्ते खा. नरेंद्र सावईकर यांचा खुलासा सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचं अभिनंदन करण्याची तयारी भाजपच्या ‘गोवा प्रदेश समिती’नं केली होती. पर्रीकर मंगळवारी गोव्यात आल्यानंतर हा अभिनंदनपर कार्यक्रम होणार होता; मात्र केंद्रातील अतिमहत्त्वाच्या बैठकांमुळं त्यांचं गोव्यात येण्याचं रद्द झालं. त्यामुळं हा अभिनंदनपर कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.Read More

Posted On September 26, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

GOA NEEDS MAHAGATHABANDHAN TO TEACH BJP A LESSON

भाजपला हद्दपार करण्यासाठी महायुतीची गरज राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया भाजपला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी विरोधकांची महायुती होणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप आणि मगो सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.Read More
तेलंगणाच्या कराराला मंत्रीमंडळाची मंजुरी चिंबलचा आयटी हब उभारण्यासाठी करणार मार्गदर्शन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती गोव्यातील आयटीच्या विकासासाठी तेलंगणा सरकारचं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खाते आणि गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खातं यांच्यात करार करण्यात करण्यात आलाय. यालादेखील बुधवारी मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. या करारानुसार तेलंगणाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खाते चिंबल इथला आयटी हब उभारण्यासाठी मदत करेल, अशी माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली. याशिवाय गोव्याला डिजिटल करण्यासाठी गुगलचंही सहकार्य घेतलं जाईल, असं पार्सेकर यावेळी म्हणाले.Read More
Close