casino Tag

बालोद्यानासमोरच तरंगणार सहावा कॅसिनो पणजीतील महावीर बालोद्यानासमोरील मांडवी नदीपात्रात लवकरच सहावा कॅसिनो दिसणार असून त्याला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झालीये. हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा यांच्या मालकीच्या ‘एम. व्ही. लकी सेव्हन’ कंपनीचा हा कॅसिनो असेल. या कॅसिनोला मांडवी नदीत आणण्याचं आश्‍वासन राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिलंय.Read More
मांडवीतील कॅसिनोंना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय मांडवीतील कॅसिनोंचे आणखी किमान तीन महिने स्थलांतर नाही पूर्ण बहुमतात पाच वर्षे सत्ता भोगूनही मांडवीला कॅसिनोमुक्त करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या भाजप सरकारनं आता पुन्हा नवीन तारीख दिलीये. या कॅसिनोंचं स्थलांतर करण्यासाठी सरकारनं आणखी तीन महिन्यांची मुदत दिलीये. जोपर्यंत दुसरी जागा निश्चित होत नाही. तोपर्यंत हे कॅसिनो न हटवण्याचा निर्णय सोमवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. तीन महिन्यांपर्यंत पर्यायी व्यवस्था न झाल्यास पुन्हा तीन महिने ही मुदतवाढ राहील, अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी यावेळी दिली.Read More

Posted On October 27, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

KANDA’S CASINO IN TROUBLE ?

सातव्या कॅसिनोविरोधात न्यायालयात याचिका सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांची याचिका विरोधी बाकावर असताना ‘मांडवीला कॅसिनो’तून मुक्त करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपनं सत्ता मिळताचं सर्व मर्यादा ओलांडत एक – एक करत सहाव्या कॅसिनोला परवानगी देण्याची तयारी केलीये. त्यामुळं भाजपनं गुंतवणुकीच्या गोंडस नावाखाली विकृत उद्योगांना खतपाणी घालण्याचा सपाटा लावलाय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागलीये. दरम्यान, सातव्या कॅसिनोला परवानगी मिळू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केलीये.Read More
Casinos Really off Limits for Goans
Are Casinos Really off Limits for Goans? The Goa home department has framed draft rules under which is a provision to arrest any person under age 21 and any Goan, irrespective of age, found gambling in a casino in the state. This comes Three years after the Goa’s gaming law was amended. Goans working in casinos will not be affected, said an official of the home department which has framed the draft rules. Goa has four offshore casinos and over a dozen onshore casinos. The checks to ensure Goans andRead More

Posted On September 14, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

CONGRESS DEMANDS OPINION POLL ON CASINOS

भाजपच्या विरोधात काँग्रेसचे आरोपपत्र तयार पुढील आठवड्यापासून आरोपपत्र घरोघरी पोहोचवणार प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची पत्रपरिषदेत माहिती गोव्यात गुजरात, दिल्ली मॉडेलची आवश्यकता नाही गोव्यात विकासाचे स्वतंत्र मॉडेल उभारण्याची गरज गोव्याच्या विकासाला खिळ बसण्यात सर्वच सरकारे जबाबदार महागठबंधवर ३० सप्टेंबरनंतर निर्णय घेणार : फालेरो भाजपच्या विरोधात काँग्रेसने आरोपपत्र तयार केले असून ते राज्यात घरोघरी पोहोचवण्यात येणाराहे. हा उपक्रम पुढील आठवड्यापासून सुरू केला जाणाराहे. यामध्ये गेल्या साडेचार वर्षांतील सरकारची सुमार कामगिरी आणि ‘यू-टर्न’ जनतेपर्यंत पोहोचवले जाईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे केंद्रीय नेते चेल्लाकुमार, माजीRead More

Posted On August 29, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

PROTEST AGAINST CASINO HELD IN CITY

मांडवीतील कॅसिनोंच्या विरोधात निदर्शने ‘गोंयच्या लोकांचो आवाज’नं केले आंदोलन ‘गोंयच्या लोकांचो आवाज’ या बॅनरखाली वीस जणांनी रविवारी कॅसिनोंच्या विरोधात निदर्शनं केली. पणजीच्या जेटीजवळ झालेल्या या आंदोलनात प्रा. प्रजल साखरदांडे आणि कपिल कोरगावकर यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. साखरदांडे यांनी कॅसिनोंच्या पर्यावरणावरील परिणामांची माहिती दिली. मांडवीचं पाणी प्रदूषित होणे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कॅसिनोंच्या नावाने बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे कपिल कोरगावकर यांनी सांगितले. इतर वक्त्यांनीही या वेळी सरकारवर जोरदार टीका केली. कॅसिनोंमध्ये जाण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो, अशी तक्रारही वक्त्यांनी केली.Read More

Posted On August 11, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

NOW ‘SAY SORRY’ FOR CASINO

कॅसिनोविरोधात ‘गोवा से सॉरी’नं थोपटले दंड कॅसिनोविरोधात पणजीत दररोज करणार आंदोलन सरकारनं मांडवीत सहाव्या कॅसिनोला परवानगी देण्याचा संकेत दिला असून याविरोधात गोवेकरांमधून संतापाची लाट उसळलीये. या कॅसिनोंना ‘गोवा से सॉरी’ गटानं आता दंड थोपटलेत. यासंदर्भात गटाचे सदस्य दररोज पणजीतील ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’समोर आंदोलन करणाराहेत. कॅसिनोमुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून सरकार मात्र महसूलावर डोळा ठेवून या विकृतीला खतपाणी घालत आहेत. हा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी या गटानं केलीये.Read More
रायबंदर आणि चोडण येथील ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेऊन भाजप शासनानं इथला कॅसिनो स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. या विषयावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सकाळी बैठक घेऊन रायबंदरच्या नागरिकांना आश्वस्थ केलं. त्यामुळं या नागरिकांनी २५ रोजी पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं. voice over रायबंदरच्या नागरिकांचा वाढता विरोध आणि राष्ट्रीय हरित लवादानं सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर, आता स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी भाजप शासनानं रायबंदरातील पाचवा कॅसिनो काढण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भात शनिवारी सकाळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रायबंदरच्या नागरिकांची बैठक घेतली अन तो कॅसिनो हटवण्याचं आश्वासनं दिलं; मात्र आत तो कॅसिनो कुठे स्थलांतरीत करणार,Read More

Posted On July 10, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

CASINO HELPS TO BOOST STATE ECONOMY : CM

कॅसिनोमुळे राज्याचा विकास महसूल वाढला, रोजगार मिळाला मुख्यमंत्री पार्सेकर यांनी उचलली तळी कॅसिनो कॉंग्रेसची देण, आम्ही सांभाळतो सार्दिन, रवी नाईक यांनी आणले कॅसिनो मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुन्हा वाजवले तुणतुणे नियमांचं उल्लंघन करून पाचव्या कॅसिनोला परवागनी दिल्यानं वनखात्यानं त्याला जोरदार आक्षेप घेतलाय; मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुन्हा तेच तुणतुणे वाजवलं. कॅसिनोमुळं राज्याचा महसूल वाढला, अनेकांना रोजगार मिळाला. त्यामुळं कॅसिनोची राज्याला गरज आहे, असं स्पष्टीकरण पार्सेकर यांनी दिलंय. हे स्पष्टीकरण करताना, कॅसिनो ही कॉंग्रेसची देण असल्याचं सांगायला पार्सेकर विसरले नाहीत. फ्रान्सिस सार्दिन आणि रवी नाईक यांच्या कारकिर्दीत कॅसिनो गोव्यात आल्याचं पार्सेकरRead More

Posted On July 10, 2016By Akshay LadIn Local

CASINOS FUNDING BJP : MICKKY PACHECO

कॅसिनोप्रश्नी भाजपने जनतेला फसवले आमदार मिकी पाशेको यांची टीका राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्षच बरे आमदार मिकी यांचे भाजपवर शरसंधान कॅसिनो हटवण्याचं वचन भाजपच्या नेत्यांनी २०१२ निवडणुकीत दिलं होतं. आता त्यांनी शब्द फिरवल्याची टीकाही आमदार पाशेको यांनी केलीये. यासंदर्भातील व्हीडीओ त्यांनी पत्रकारांना दाखवत यापुढे भाजपशी युती करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. कोणताही राष्ट्रीय पक्ष गोव्याचं हित बघत नसल्यानं स्थानिक पक्षांनाच प्राधान्य द्यायला हवं, असंही पाशेको यांनी म्हटलंय.Read More
Close