cm Tag

गोव्यात गुंतवणूक करण्यास चीन उत्सुक ‘थ्रीडी प्रिंट’ उद्योग स्थापण्यास चीन अनुकूल गुंतवणूक करण्यापूर्वी कौशल्य विकास करावा लागणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा गोव्यात ‘थ्रीडी प्रिंटिंग’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी चीनने दर्शवलीये; मात्र गुंतवणूक करण्याआगोदर त्यांना गोव्यात कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, अशी माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More
रवींद्रनाथ पै काकोडे यांना ‘जीवन गौरव’ मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण ‘राज्य एनसीसी संघटने’तर्फे कार्यक्रमाचे आयोजन ‘राज्य एनसीसी संघटने’तर्फे माजी विद्यार्थी रवींद्रनाथ पै काकोडे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला. कला अकादमीत झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. यावेळी अन्य एनसीसीच्या चार माजी विद्यार्थ्यांनाही पुरस्कार देण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचा समावेश होता.Read More
गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थींना शिष्यवृत्तींचे वाटप मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या २० लाभार्थींना शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शिष्यवृत्ती प्रदान केल्या. यावेळी उच्च शिक्षण सचिव नीला मोहनन, उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.Read More
गोवा विद्यापीठात ‘डिजिटल इंडिया’ कार्यशाळा सुरू मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन ४० महाविद्यालयांना मोफत वायफाय सुविधा देणार चिंबलच्या आयटी हबला लवकरच मिळणार चालना चिंबलातील आयटी हबसाठी गोव्याचा तेलंगणाशी करार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रम गोव्यातही सुरू करण्यात आला असून मंगळवारी गोवा विद्यापीठात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. गोवा विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या सभागृहात हा उद्घाटनसोहळा पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत ‘डिजिटल इंडिया कार्यशाळा घेण्यात येताहे. या कार्यशाळेत गोव्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झालेत. यावेळी मुख्यमंत्री पार्सेकरRead More
प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी खास समिती देणार अहवाल केवळ माध्यम प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापना नाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा भाषा माध्यम प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं शिक्षण तज्ञांची समिती स्थापन केल्याची घोषणा यापूर्वी सरकारनं केली होती; मात्र सरकारनं हा शब्द सोयीस्कररित्या फिरवलाय. ही समिती केवळ माध्यम प्रश्न सोडवण्यासाठी नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी पत्रकारांसमोर केला. प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी काय करायला हवे, याची पडताळणी करण्यासाठी ही समिती स्थापन केल्याची माहिती पार्सेकर यांनी यावेळी दिली.Read More

Posted On August 11, 2016By Akshay LadIn Local, Politics, Top Stories

JUDICIAL INQUIRY OF GOA SAHAKARI BANK : CM

गोवा सहकारी बँकेतील घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे सभागृहाला आश्वासन मौल्यवान मालमत्ता कवडीमोल किमतीत विकल्याचा आरोप सहकार निबंधक आणि बँक संचालकांची मिलीभगत असल्याचा आरोप गोवा राज्य सहकारी सोसायटी बँकेत मौल्यवान मालमत्तेचा कवडीमोल भावात लिलाव करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सभागृहाला दिलं. सहकार निबंधक आणि सोसायटीचे अध्यक्ष यांनी संगनमतानं बँकेत घोटाळा केल्याचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई आणि आमदार दिगंबर कामत यांनी सभागृहासमोर मांडला होता. यावेळी सर्व विरोधकांबरोबरच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीदेखील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.Read More
Chief Minister was shocked to know that there wasn’t a single case of drugs registered in Vasco for the last 3 years , he was reading the answers of police department which was asked by the Vasco MLA Carlos Almeida. CM informed the house that after the reply asked at the start of the assembly then the police department registered two cases within 3 days in which 3 people were arrested. CM Parsekar on the floor of the house accepted that drugs are being sold openly at the reputed educationalRead More

Posted On August 9, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

NO MORE OLD AGE HOMES IN GOA : CM

राज्यात दहा वृद्धाश्रम कार्यान्वित नवे वृद्धाश्रम बांधण्याचा सरकारचा विचार नाही मुख्यमंत्री पार्सेकर यांचा सभागृहात खुलासा राज्यात दहा वृद्धाश्रम असून आणखी नवीन वृद्धाश्रम स्थापन करण्याचा सरकारचा विचार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी सभागृहात केला. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.Read More
पुण्यतिथीनिमित्त पत्रकारांची टिळकांना श्रद्धांजली गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचा कार्यक्रम पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात वाढ होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेनं ‘पत्रकारिता दिन’ आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माहिती खात्याचे संचालक जयंत तरी, गुजचे अध्यक्ष सद्गुरू पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्यांच्या तसबिरीला आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या निवृत्ती वेतनात घसघसीत वाढ करत ते ८ हजार रुपये करण्याचं आश्वासनं दिलं.Read More
‘कामगार निवड मंडळ’ला मान्यता मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील कर्मचारी भरती करणार सर्व सरकारी खात्यांमध्ये क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करताना संबंधित खाते मुलाखत घेऊन भरती करत असत. त्यामुळं उमेदवारांची पळापळ चालू असायची. हा प्रकार शुक्रवारपासून बंद झाला. यापुढे क आणि ड वर्गासाठी एकाच ठिकाणी मुलाखत घेऊन त्यानंतर संबंधित खात्यांत त्यांची भरती केली जाणाराहे. यासाठी ‘कामगार निवड मंडळ’ स्थापन करण्यावर शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. चालू अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मांडलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
Close