दीनदयाळ योजना खाजगी इस्पितळांनाही होणार लागू आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे सभागृहाला आश्वासन ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ सध्या केवळ सरकारी इस्पितळांना लागू आहे. ही योजना सर्वच खाजगी इस्पितळांनाही लागू केली जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी शुक्रवारी सभागृहाला दिलं. आमदार बाबुश मोन्सेरात यांनी प्रश्न काळात याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. दीनदयाळ योजनेखाली ४४७ आजारांचा समावेश करण्यात आला असला तरी उल्लेख नसलेल्या थंडी, ताप यांसारख्या आजारांवरही मोफत उपचार केले जातील, असं डिसोझा यांनी सांगितलं.
Read More