मांडवी नदीत अखेर सहावा कॅसिनो दाखल गोपाळ कांडा यांचा कॅसिनो मांडवीत दाखल सहावा महाकाय कॅसिनो पाहून पणजीकर झाले अचंबित मांडवीला कॅसिनोमुक्त करण्याचं आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या सरकारनं कॅसिनोचं स्थलांतर तर सोडाच, उलट सहाव्या कॅसिनोला मान्यता दिल्यानं, गुरुवारी हा कॅसिनो नदीपात्रात दाखल झाला. सध्या हे कॅसिनो जहाज वेरे-बेतीच्या भागात नांगरण्यात आलंय.
Read More मांडवी पुलावरून आंतरराज्य बस वाहतुकीवर निर्बंध तिसर्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निर्बंध मांडवी नदीवरील तिसर्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नदीवरील दोन्ही पुलांवरून अवजड आणि मध्यम स्वरूपाची व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या काळात निर्बंध घालण्यात आले आहेत. आंतरराज्य प्रवासी बस वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात येणार असून ते लागू होण्याची तारिख लवकरच निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read More वाहतूक व्यवस्थेवर सचिवालयात बैठक संपन्न मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामाला पुन्हा वेग येत्या जुलैपासून खांबावर ठेवणार स्लॅब स्लॅब बसवताना एका पुलावरील वाहतूक रात्री राहणार बंद राज्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्याहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी पर्वरी सचिवालयात बैठक घेऊन या सूचना केल्या. यावेळी कळंगूटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, पर्वरीचे महसूलमंत्री रोहन खंवटे, पणजीत आमदार सिद्धार्थ कुंकळकर आणि वाहतूक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पर्वरीतील साई सर्व्हिसजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा झाली. सध्या मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या
Read More मांडवीतील कॅसिनोंना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय मांडवीतील कॅसिनोंचे आणखी किमान तीन महिने स्थलांतर नाही पूर्ण बहुमतात पाच वर्षे सत्ता भोगूनही मांडवीला कॅसिनोमुक्त करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ देणाऱ्या भाजप सरकारनं आता पुन्हा नवीन तारीख दिलीये. या कॅसिनोंचं स्थलांतर करण्यासाठी सरकारनं आणखी तीन महिन्यांची मुदत दिलीये. जोपर्यंत दुसरी जागा निश्चित होत नाही. तोपर्यंत हे कॅसिनो न हटवण्याचा निर्णय सोमवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. तीन महिन्यांपर्यंत पर्यायी व्यवस्था न झाल्यास पुन्हा तीन महिने ही मुदतवाढ राहील, अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी यावेळी दिली.
Read More मांडवीतील कॅसिनोंच्या विरोधात निदर्शने ‘गोंयच्या लोकांचो आवाज’नं केले आंदोलन ‘गोंयच्या लोकांचो आवाज’ या बॅनरखाली वीस जणांनी रविवारी कॅसिनोंच्या विरोधात निदर्शनं केली. पणजीच्या जेटीजवळ झालेल्या या आंदोलनात प्रा. प्रजल साखरदांडे आणि कपिल कोरगावकर यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. साखरदांडे यांनी कॅसिनोंच्या पर्यावरणावरील परिणामांची माहिती दिली. मांडवीचं पाणी प्रदूषित होणे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कॅसिनोंच्या नावाने बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे कपिल कोरगावकर यांनी सांगितले. इतर वक्त्यांनीही या वेळी सरकारवर जोरदार टीका केली. कॅसिनोंमध्ये जाण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो, अशी तक्रारही वक्त्यांनी केली.
Read More मांडवी पुलाच्या सल्लागारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न मांडवी पुलाची तपासणी चेन्नईच्या आयआयटीमार्फत होणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विरोधकांन दिले उत्तर जीएसआयडीसीच्या सल्लागारांवरून सभागृहाचं कामकाज तापलं असताना आमदार विजय सरदेसाई यांनी, मांडवी पुलाचा मुद्दा उपस्थित करून त्यात भर घातली. “गुजरातमधील गांधीनगर भागातील नवा उड्डाणपूल कोसळला. या उड्डाणपुलाच्या सल्लागाराची नेमणूक मांडवी पुलासाठी केलीये”, असा मुद्दा सरदेसाई यांनी उपस्थित करतातचं सभागृहात गोंधळ माजला. यावेळी पार्सेकर यांनी “मांडवी पूलाची पूर्ण तपासणी आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे केली जाणार असल्यानं गोवेकरांनी चिंता करू नये”, असं सांगून विरोधकांचा गोंधळ राखला.
Read More पाचव्या कॅसिनोविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया तो नवा नव्हे, जुनाच कॅसिनो नव्या कॅसिनोला परवाना देणार नाही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केले ‘ट्विस्ट’ दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाचव्या कॅसिनोचं समर्थनं केलंय. हा कॅसिनो नवा नाही. तो जुना कॅसिनो असून, काही कारणास्तव तो बंद होता. त्यामुळं सरकारनं नवीन कॅसिनोला मान्यता दिली, असं म्हणता येणार नाही. सरकार नवीन कॅसिनोला मांडवीत परवागनी देणार नाही, असा युक्तिवाद पार्सेकर यांनी केला. रायबंदरच्या मच्छीमारांनी केला कॅसिनोला विरोध रायबंदरमधून कॅसिनो त्वरित हटवण्याची मागणी मांडवीत रायबंदरच्या बाजूला भाजप सरकारनं कॅसिनोला मान्यता दिल्यानं स्थानिक मच्छीमार संतप्त बनलेत. हा कॅसिनो तिथून त्वरित
Read More