news Tag

पाच वर्षात केरी पंचायत विकासात शून्य पंचायत कार्यालयातील कर्मचारीही ‘सुशेगाद’ अनेक ग्रामस्थांची अडली कामे नऊ पंचसदस्य असलेल्या केरी पंचायतीत गेल्या पाच वर्षांत कसलाच विकास झाला नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. या पंचायतीकडे मंडळानं अजिबात लक्ष दिलं नसल्यानं इथले कर्मचारीदेखील कामचुकार बनलेत. साध्यासाध्या कामांसाठी ग्रामस्थांना हेलपाटे मारायला लागत आहेत, अशी टीका ग्रामस्थ अंकुश गवस आणि चंद्रकांत परब यांनी केलीये.Read More
शिवोलीतील मधलेभाट वाड्यावरील प्रकार शौचटाकीच्या बांधकामाच्या वादातून प्रकार घडल्याचा संशय वाड्यावरील ग्रामस्थांनी केली आरोग्य खात्याकडे तक्रार राज्यातील अनेक भागांत पाण्याची तीव्र टंचाई असताना शिवोलीत पूर्ववैमनस्यातून शुद्ध पाण्याने भरलेली विहिरी ऑईल टाकून दूषित केल्याचं शुक्रवारी सकाळी आढळून आलं. शिवोलीतील मधलेभाट वाड्यावर गुरुवारी रात्रीच्या काळोखाचा फायदा उठवत हे कृत्य करण्यात आलं. त्यानंतर लगेचच वाड्यावरील गावकऱ्यांनी पोलीस आणि आरोग्य खात्याकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, या विहिरीशेजारी एक शौचटाकी बांधण्यात येताहे. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानं त्यानंच हे कृत्य केल्याचा आरोप वाड्यावरील महिलांनी केलाय.Read More
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर ‘इन गोवा’ची कार्यवाही पर्वरीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीवर विशेष रिपोर्ट पाच ‘ट्राफिक सिग्नल’ बसवलेत आडमुठ्या पद्धतीने’ ‘ट्राफिक सिग्नल’मुळे वाहनचालकांचां होतोय गोंधळ ‘यू टर्न’साठी सिग्नल नसल्यामुळे गोंधळात भर अभ्यासाविना बसवलेत ‘ट्राफिक सिग्नल’ राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवणक्षेत्राची माहिती गोळा करण्याचा आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलाय. त्याचबरोबर अपघात कमी करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी देखील जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन पर्रीकर यांनी मंगळवारच्या बैठकीतून केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘इन गोवा’नं बुधवारी पर्वरीतील महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक खात्यानं उभारलेले ‘ट्राफिक सिग्नल’च धोकादायक असल्याचं दिसून आलं. अतिशय आडमुठ्या पद्धतीनंRead More

Posted On April 14, 2017By adminIn Top Stories

Sunburn 2017 in Goa Again?

पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी ‘सनबर्न’ हवेच पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांचे विधान गोव्यात पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी ‘सनबर्न’ची गरज आहे. ही पार्टी गोव्यात होणे गरजेचे असल्याचं विधान मंत्री आजगावकर यांनी केल्यानं पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. सनबर्न आयोजित करताना कुठलेही गैरप्रकार घडू देणार नसल्याही ग्वाहीदेखील मंत्री आजगावकर यांनी यावेळी दिली.Read More
लमाणी’ उच्चारला पत्रकार जबाबदार पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांची सारवासारव लमाणी शब्दावरून राज्यात वादळ उठल्यानंतर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी शुक्रवारी आपलं विधान बदलून पत्रकारांना दोष दिला, पत्रकारांनी तसा प्रश्न विचारला म्हणून आपण तसं उत्तर दिल्याचं स्पष्टीकर मंत्री आजगावकर यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर लमाणीचं नव्हे तर कोणीही बेकायदेशीर व्यवसाय करत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री आजगावकर यांनी यावेळी दिला.Read More
समुद्रात बुडून तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू खारीवाड्यातील प्रकाराने माजली खळबळ मयत मुलाचे नाव निझाम शेख खारीवाडा इथं निझाम शेख या तेरा वर्षांच्या मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. समुद्रकिनारी मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना हा प्रकार घडला. यावेळी त्याला प्रथम चिखलीच्या कॉटेज इस्पितळात आणण्यात आलं. त्यानंतर त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, चिखली रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर निझामचे प्राण वाचले असते. परंतु त्यांनी न तपासताच निझामला मृत्य घोषित केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय.Read More
प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याच्या निव्वळ अफवा अफवा पसरवणाऱ्यांना पक्षात स्थान नाही कॉंग्रेस पक्ष ध्येय धोरणे असलेला पक्ष कधीही पदाची अपेक्षा धरली नाही लुईझिन फालेरो यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर कॉंग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकल्यानं पक्षातील काही नेत्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या माथ्यावर खापर फोडण्याची तयारी केलीये; मात्र या नेत्यांना फालेरो यांनी शुक्रवारी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. अशा अफवा पसरवणे कॉंग्रेसच्या तत्वत बसत नाही. अशा अफवा पसरवणाऱ्यांना कुत्री म्हटल्यास तो कुत्र्यांचा अपमान होईल, अशी कडवट प्रतिक्रिया फालेरो यांनी व्यक्त केलीये.Read More
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी चुकून फिरत्या विक्रेत्यांवर टीका करताना ‘लमाणी’ हा शब्द वापरला असावा, पण मंत्र्यांना कोणताही जातीवाचक शब्द उच्चारायचा नव्हता, त्याचा रोख फिरत्या विक्रेत्यांवर होता, असा खुलासा उपसभापती लोबो यांनी यावेळी केला.Read More

Posted On April 11, 2017By Akshay LadIn Top Stories

Rave Parties Don’t Happen in Goa: Dy Speaker

जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी गोव्यातील किनारी भागात ड्रग्ज आणि रेव्ह पार्ट्या चालू असल्याचं विधान केलं होतं. त्यात काही तथ्य नसल्याचा खुलासा उपसभापती लोबो यांनी केलाय. गोव्यात रेव्ह पार्ट्या होत नाहीत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी होणाऱ्या संगीतरजन्या ही गोव्याची संस्कृती असल्याचं विधान लोबो यांनी केलंय.Read More
पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा वांते सत्तरीत अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण वांते सत्तरी येथील गावकरवाड्यावरील महिलांनी मंगळवारी बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत असल्यानं नळ कोरडे पडलेत. याचा परिणाम स्थानिकांच्या जनजीवनावर होताहे. त्यामुळं हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी या महिलांनी केलीये.Read More
Close