PARSE Tag

आमदार दयानंद सोपटे करताहेत ‘प्रसिद्धी स्टंट’ सोपटे घालत आहेत विकासाला खीळ पार्सेतील सरपंच, पंचायत सदस्यांची खरमरीत टीका गेल्या भाजप सरकारच्या काळात पार्से पंचायतक्षेत्रात वायडोंगरावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यात आला होता. त्याचबरोबर खाजन गुंडो मानसीवर भक्कम बांध बांधण्यात आला आहे. या कामांची पाहणी करून विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांनी नुकतीच तत्कालीन कडाडून टीका केली होती. याशिवाय पार्से पंचायतीला भेट देऊन तिथल्या कारभारावरही जोरदार आसूड ओढले होते. याला पंचायतीचे सरपंच, सदस्य आणि माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा निव्वळ आमदार सोपटे यांचा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याची टीका त्यांनी केलीये.Read More
पार्सेतील मानसीचे बांधकाम पूर्ण मानसीच्या बांधावरच बांधला पूल मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केली कामाची पाहणी पर्यटनदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न पार्सेतील मानस आणि त्यावरील पुलाचं काम पूर्ण झालं असून या कामाची पाहणी शनिवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केली. या ठिकाणी मानसीच्या बांधावरच पूल बांधला असून रस्ताही तयार करण्यात येताहे. या ठिकाणी पर्यटन स्थळही विकसित करण्यात येणाराहे. या सर्व कामांवर साधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केली.Read More
Close