Protest Tag

GLOBE GROUND  LOADERS PROTEST OUTSIDE DABOLIM TERMINALRead More
‘गोसुमं’चा सहाव्या कॅसिनोला विरोध कॅप्टन ऑफ पोर्टसमोर केली निदर्शने कांडा यांच्या कॅसिनोच परवाना रद्द करण्याची मागणी ‘मन्नू आम्हाला तुझ्यावर भरोसा नाय हाय?’ ‘गोसुमं’च्या गीतानं राजधानी दणाणली सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात पूर्वी मोर्चे काढून किंवा निदर्शने करून आंदोलनं केली जायची. आता हा ट्रेंड बदलत चाललाय. आता ही आंदोलने नुसती मोर्चा काढून निषेध करण्यापूरती संकुचित राहिलेली नाहीयेत. आणि विशेषत: जेव्हा कलाकार अशा आंदोलनांमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्याची परिणामकारकता आणखीच वाढते. हल्लीच आरजे मलिष्कानं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात रचलेलं गाणं तुम्ही ऐकलचं असेल. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का? या गाण्याच्या चालीवर रचलेलं हीRead More
मिरामार किनाऱ्यावर कॅसिनो जहाज रुतल्याचे प्रकरण ‘फा. बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’तर्फे निषेध मिरामार इथं रुतलेल्या सहाव्या कॅसिनो जहाजाला विरोध करण्यासाठी ‘फादर बिस्मार्कस म्युझिकल वॉरियर’ यांनी मंगळवारी संगीताच्या माध्यमातून निषेध नोंदवला. या आंदोलनासाठी त्यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावली होती; मात्र न्यायदंडाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ही यंत्रणा बंद केली. कोणतीही परवानगी न घेता ही ध्वनिक्षेपक यंत्रणा लावल्याची सूचना मिळताचं अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामुळं आंदोलक नाराज बनले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि कॅसिनोच्या विरोधात संगीताच्या माध्यमातून जोरदार टीका केली.Read More
कांदोळीत ‘मोबाईल टॉवर’ उभारण्यास विरोध ‘मोबाईल टॉवर’ त्वरित हटवण्याची स्थानिकांची मागणी लोकांना नको असल्यास ‘मोबाईल टॉवर’ काढणार उपसभापती मायकल लोबो यांनी दिले आश्वासन कांदोळीतील बामनवाडो या लोकवस्तीत एका इमारतीवर बेकायदेशीरपणे ‘मोबाईल टॉवर’ उभारल्याचं उघडकीस आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अत्यंत गुपचूपपणे उभारलेला हा बेकायदेशीर टॉवर त्वरित हटवावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.Read More
बोंडवळचं तळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर कालापुरचे ग्रामस्थ बनलेत संतप्त स्थानिकांनी मोर्चा काढून केला निषेध कालापूरचं बोंडवळचं तळं पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे नागरिकांनी रविवारी बांबोळी स्टेडियमच्या बाहेर मोर्चा काढून या प्रकरणाचा निषेध केला. कालापुरात १२० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या बोंडवळच्या तळ्याची एक बाजू एका बिल्डरनं बेकायदेशिररीत्या उद्ध्वस्त केलीय. हा परिसर जैव विविधतेनं संपन्न असून बेकायदेशीररीत्या या परिसरातील झाडं कापली जात आहेत. स्थानिकांनी या विरोधात जिल्हाधिकारी, मामलेदार, वन विभाग यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतु अजुनही यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त बनलेत. दरम्यान नुकत्याच सत्तेवर आलेल्या पर्रीकर सरकारनंRead More
राजभवनाबाहेर नागरिकांचा जमाव भाजपच्या शपथविधीला केला विरोध जमावाला अडवण्यासाठी होता पोलीस फौजफाटा एका बाजूनं भाजपच्या मंत्र्यांचा शपथविधी चालू असताना काही नागरिकांनी राजभवनाबाहेर जमाव करून भाजपविरोधात घोषणाबाजी केली. गोव्याच्या मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं असताना या पक्षाचा मुख्यमंत्री कसाकाय बघू शकतो? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला. या नागरिकांना आवरण्यासाठी राजभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाट तैनात करण्यात आला होता.Read More
चौगुलेच्या कामगारांची शोरूमसमोर निदर्शने पगारवाढीच्या मागणीसाठी छेडले प्रखर आंदोलन न्यायालयाचा आदेश असताना पगारवाढ नाहीच पगारवाढीच्या मागणीसाठी चौगुले कंपनीच्या ४० कामगारांनी गुरुवारपासून संप पुकारलाय. या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फातोर्डा इथं कंपनीच्या शोरूमसमोरचं जोरदार निदर्शने केली. या कामगारांनी २००८ साली पगारवाढीच्या मागणीसाठी न्यायालयीन लढा दिला होता. हा लढा जिंकल्यानंतर न्यायालयानं कंपनीला पगारवाढ करण्याचा आदेश दिला होता; मात्र कंपनीचं व्यवस्थापन या आदेशालादेखील जुमानत नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय.Read More
‘पेन्ह द फ्रान्स’मध्ये अवैध डोंगरफोंड स्थानिकांनी एकजूट करून केली निदर्शने पर्वरी मतदारसंघातील पेन्ह द फ्रांस पंचायतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगर कापून अवैधपणे भूखंड निर्माण केले जाताहेत. या प्रकाराच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी निदर्शने केली. हा प्रकार त्वरित बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.Read More
शॅक्समालकांचे पर्यटन भवनासमोर दोन दिवस उपोषण पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शॅक्सवाटप नाही सुस्त पर्यटन खात्याच्या विरोधात उपसले उपोषणाचे हत्यार दुर्लक्ष केल्यास पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी काळे झेंडे दाखवणार शॅक्समालक संघटनेनं दिला गंभीर इशारा पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी पर्यटन खात्यानं शॅक्स वाटप केलेलं नाही. या प्रकाराविरोधात संतप्त शॅक्स मालकांनी सोमवारपासून उपोषणाचं हत्यार उपसलंय. या शॅक्स मालकांनी पाटो-पणजीतील पर्यटन भवनासमोर दोन दिवसांचं उपोषण सुरू केलंय. या आंदोलनानंतर तरीदेखील सरकारनं डोळे उघडले नाही, तर १३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावेळी काळे झेंडे दाखवू, असा इशारा यावेळीRead More
मच्छीमारांवरील लाठीचार्ज प्रकरण कश्यप यांच्यासह सर्व पोलिसांना क्लिन चीट सरकारला अपेक्षित असा अहवाल सादर चौकशी अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली क्लीन चीट प्रलंबित मागण्या धसास लावण्यासाठी, लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या पारंपरिक मच्छिमारांवर १२ में २०१६ या दिवशी पोलिसांनी निर्दयीपणे लाठीचार्ज केल्याचं इन गोवावरून सर्व जगानं पाहिलं; मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं अगदी सरकारला अपेक्षित असा अहवाल सादर करत पोलिसांना क्लिन चीट दिली. या प्रकारानं सामान्य जनतेला कोणीही वाली नसल्याची भावना मच्छीमार बांधवांमध्ये झालीये. १. आधुनिक पद्धतीनं केली जाणारी मासेमारी बंद करावी, या मागणीसाठी पारंपरिक मच्छीमारांनी पूर्वसूचना देऊन बुधवारीRead More
Close