rain Tag

High Winds And Sudden Rain Wreak Havoc In CanaconaRead More

Posted On March 15, 2018By adminIn Top Stories

Goa To See Rains For More Two Days

Goa To See Rains For More Two DaysRead More
प्रदीर्घ विश्रांतीनंतर गोव्यात पावसाचे पुनरागमन चतुर्थीकाळात मुसळधार पावसाची शक्यता प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी राज्यातील अनेक भागात पावसानं मंद गतीनं हजेरी लावली. दरम्यान, ऐन गणेश चतुर्थीच्या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये. गेल्या दीड महिन्यापासून पावसानं दडी मारली होती. त्यामुळं नेहमीच्या तुलनेत यंदा २६ इंच इतकी कमी पावसाची नोंद झालीये. प्रदीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी संध्याकाळपासून राज्याच्या अनेक भागांत आकाशात काळेकुट्ट मेघ दाटून आल्याचं दिसून आलं. शुक्रवारी रात्रीपासून काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या राज्यातील धरणे पाण्याने भरलेली असली तरी सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची गरज आहे. अन्यथा यावर्षी मार्चपासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणविण्याचीRead More
राज्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पडझडी तारीवाड्यावर घराची भिंत कोसळून लाखाची हानी मंत्री गोविंद गावडे यांनी केली घराची पाहणी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं शहरी भागातील जनजीवन थंडावलं असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना सुरू आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रियोळ मतदारसंघातील तारीवाडा भागात विश्वंभर फडते यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे १ लाख रुपयांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं कलामंत्री गोविंद गावडे यांनी फडते यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.Read More
जून महिन्यात समाधानकारक पाऊस हवामान खात्याच्या संचालकांचा दावा जून महिन्यात पावसाचं प्रमाण समाधानकार राहिल्याची माहिती गोवा वेधशाळेच्या संचालकांनी सोमवारी पत्रकारांना दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या चार दिवसांत अशा सरी कोसळत राहतील, अशी शक्यताही खात्याच्या संचालकांनी व्यक्त केलीये.Read More

Posted On June 28, 2017By Akshay LadIn Local, People, Top Stories

HEAVY RAINS KNOCKS DOWN TREES AT ST CRUZ

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझडी सांताक्रूझमध्ये घरावर कोसळला महाकाय वृक्ष घराबरोबरच वीजखांब, टेलिफोन खांबांचेही नुकसान वीजतारा तुटल्याने पहाटे ३.१५ वा. पासून वीज खंडित नागरिकांचे हाल; वाहतुकीलाही झाला अडथळा अग्निशामक दलानं धाव घेऊन केले मदतकार्य सुरू राज्यात मंगळवारपासून मान्सून पुन्हा वेगानं सक्रीय झाल्यानं अनेक ठिकाणी पडझडींच्या मालिका सुरू झाल्याहेत. या पडझडीमध्ये सांताक्रूझ चर्चजवळील एक महाकाय वृक्ष घरावर कोसळून मोठं नुकसान झालं. या घटनेत टेलिफोन आणि वीजखांबदेखील उखडून पडले. त्यामुळं रात्री सव्वा तीन वाजल्यापासून या भागातील वीज आणि टेलिफोन सेवा खंडीत झालीये. यासंदर्भात अग्निशामक दलाला माहिती मिळताच दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊनRead More
भात लागवडीसाठी बळीराजाची लगबग सुरू राज्यात मान्सूनने चांगली सलामी दिल्यानं बळीराजा सुखावला असून भात शेतीची लागवड करण्यासाठी लगबग सुरू झालीये. सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी वर्षपद्धतीप्रमाणे लागवड सुरू केल्याची माहिगी सांताक्रूझ, मेरशीतील शेतकऱ्यांनी दिली.Read More
मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी पडझड बेलाबाय भागात दोन घरांवर कोसळली संरक्षणभिंत दोन्ही घरांची मिळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान राजधानी पणजीसह राज्यात विविध भागात मंगळवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं विविध ठिकाणी पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलीये. वास्कोतील बेलाबाय भागात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एक संरक्षण भिंत कोसळून दोन घरांचं नुकसान झालं. यामध्ये तब्बल १० लाख रुपयांची हानी झाल्याचा दावा घरमालकांनी केलाय.Read More
सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले अनेक ठिकाणी पडझडी; लाखो रुपयांचे नुकसान म्हापशानंतर राजधानीतील रस्तेही गेले पाण्याखाली सरकारी यंत्रणा ठरली कुचकामी; मान्सूनपूर्व कामाचा उडाला फज्जा राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय. त्यामुळं गेल्या महिनाभरापासून उष्णतेनं हैराण झालेल्या गोवेकरांना दिलासा मिळाला. सलग तिसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली. दुपारी तर मुसळधार पावसानं कहर केला. यामुळं राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप आलं होतं; विशेषत: म्हापशातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्यानं म्हापसेकरांना जबरदस्त फटका बसला. त्यांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान, येत्या २४ तासांतRead More

Posted On September 24, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

HEAVY RAINFALL IN GOA FOR FEW MORE DAYS

राज्यातील विविध भागांना शुक्रवारी संततधार पावसाने झोडपून काढले आहे. सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाऱ्या बसगाड्याही सकाळी वेळवेर पोहचू शकल्या नाहीत. आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.Read More
Close