RENOVATION Tag

FISH VENDORS DEMAND RENOVATION OF FISH MARKET IN CALANGUTERead More
‘महालक्ष्मी वाचनालय’ टाकणार कात वाचनालयाच्या पुनर्बांधणीची पायाभरणी उत्साहात संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते शिलान्यास मळा-पणजी इथल्या १०८ वर्षांपूर्वीच्या ‘महालक्ष्मी वाचनालया’ची पुनर्बांधणी करण्यात येत असून, या कामाची पायाभरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. शनिवारी झालेल्या या पायाभरणी सोहळ्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, कला-संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, महापौर सुरेंद्र फुर्तादो आदी मान्यवर उपस्थित होते.Read More
म्हापसा पोलीस स्थानकाचे दुरुस्तीकाम होणार सुरू रखडलेले दुरुस्तीकाम आठवडाभरात सुरू करणार उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे आश्वासन दुरुस्तीकामावर होणार ६ कोटी खर्च म्हापसा पोलीस स्थानकांच्या दुरुस्तीचं रखडलेलं काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल, असं आश्वासनं उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिलंय. मंगळवारी मंत्री डिसोझा यांनी संबंधित खात्याचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या पोलीस स्थानकाचे पाहणी केली.Read More
दुरस्तीचा परवाना घेऊन सुरू केले नवे बांधकाम अन्साभाट-म्हापसा येथील प्रकार स्थानिकांनी विचारला नगराध्यक्षांना जाब नगराध्यक्षांनी बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस अन्साभाट-म्हापसा भागात दोन कपेल्सच्या खाजगी मालमत्तेत राहणाऱ्या कुळांनी पालिकेकडून घरे दुरुस्त करण्यासाठी परवाने घेऊन नवीन बांधकाम चालू केल्यानं वाद निर्माण झालाय. या प्रकारावर तक्रार केल्यानंतर पालिका मुख्याधिकाऱ्यांना बांधकाम करणाऱ्याला स्थगितीचा आदेश दिला होता; मात्र नगर नियोजन खात्यानं त्या स्थगितीलाचं स्थगिती दिली. त्यामुळं संतप्त बनलेल्या स्थानिक मंगळवारी नगराध्यक्षांना जाब विचारला. दरम्यान, नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी बांधकाम करणाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावलीये.Read More
Close