RIBANDAR Tag

भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार रायबंदर पाटो इथली दुर्घटना रायबंदर पाटो भागात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा दुचाकीस्वार अरुंद रस्त्यावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या खाजगी प्रवासी बसवर आपटला, अशी प्राथमिक माहिती स्थानिकांकडून मिळतीये. दरम्यान, रायबंदर रस्त्यावर यापूर्वीही अपघातांच्या मालिका घडून अनेकांचे बळी गेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्यानं अपघातप्रणव क्षेत्रात गतिरोधकही उभारले आहेत, मात्र वाहतुकीची शिस्त मोडून वाहनं चालवली जात असल्यानं अपघातांची शृंखला अद्यापही चालू आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांनी देखील शिस्त पाळनं गरजेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटू लागलीये.Read More
कार – दुचाकी अपघातानंतर मांडवी नदीपात्रात पडून एक ठार रायबंदर येथील दुर्घटना; दुचाकीचालक गंभीर जखमी मयत युवकाचं नाव रोहन परब; जखमीचे नाव सुरज नाईक रायबंदर इथं कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीस्वार रोहन परब हा बाजूला मांडवी नदीच्या पात्रात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकीचालक सुरज नाईक हा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.Read More

Posted On July 7, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

Ribandar Residents say no to Casino

चोडणच्या पक्षी अभयारण्याजवळ पार्क करून ठेवलेला कॅसिनो त्वरित तेथून हटवावा, या मागणीसाठी रायबंदरच्या नागरिकांनी गुरुवारी रायबंद जेटीवर निषेध केला. पंधरा दिवसांत हा कॅसिनो न हटवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनास कॉंग्रेस आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार रोहन खंवटे आणि पणजी महापालिकेचे नगरसेवक रुपेश हळर्णकर यांनी पाठिंबा दिला.Read More
Close