sanguem Tag

सांगे, नेत्रावळीकरांचा वीज कार्यालयावर मोर्चा विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ हैराण वारंवार चालू असलेल्या विजेच्या लपंडावाला कंटाळून नेत्रावळी-सांगेतील ग्रामस्थांनी सांगे वीज कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सांगे, नेत्रावळीचे सरपंच, उपसरपंच आणि पंचायत सदस्य उपस्थित होते, मात्र साहाय्यक अभियंता गैरहजर राहिल्यानं त्यांची निराशा झाली.Read More
सांगेतील बालोद्यान दुरुस्तीला सात नगरसेवकांचा ‘खो’ नगराध्यक्ष सूर्यदत्त नाईक यांचे दुरुस्तीला पाठिंबा बालोद्यान दुरुस्तीसाठी युवासेनेनं केली होती पंतप्रधानांकडे तक्रार पंचायत संचालकांनी पालिकेला दिला होता दुरुस्तीचा आदेश सात नगरसेवकांनी विरोध दर्शवल्यानं प्रस्तावावर निर्णय नाहीच सांगे बाजारातील पोर्तुगीजकालीन बालोद्यान दुरुस्त करण्याच्या ठरावाला पालिका मंडळाच्या बैठकीत सात नगरसेवकांनी विरोध केल्याची माहिती मुख्याधिकारी प्रमोद देसाई यांनी पत्रकारांना दिली. या उद्यानाची पूर्णपणे दुरवस्था झालीये. या ठिकाणी मुलांना खेळणदेखील धोकादायक बनलंय. ‘युवा सेने’नं यासंदर्भात पंतप्रधानांकडे तक्रार केल्यानंतर राज्य सरकारनं हे उद्यान दुरुस्त करण्याचा आदेश पालिका मंडळाला दिला होता. यासंदर्भातील ठराव पालिका मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला; मात्रRead More
सांगेत खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्त्यांचे जाळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन तिसऱ्या टप्प्यातील रस्ता प्राधान्याने घेण्याची मागणी सांगे भागात खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते बांधण्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलंय. त्या कामाला आता पुन्हा चालना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सभागृहाला दिली. खाण व्यवसाय बंद पडल्यानं स्वतंत्र रस्त्यांचं काम बंद करण्यात आलं होतं, असं पार्सेकर यांनी यावेळी सांगितलं. आमदार सुभाष फळदेसाई, आमदार नीलेश काब्राल आणि आमदार प्रमोद सावंत यांनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला होता.Read More
सांगे मतदारसंघात लवकरच दोन पर्यटन प्रकल्प बुडबुड्याची तळी, दत्तगुफा मंदिराचा होणार विकास पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे आश्वासन सांगे मतदारसंघातील बुडबुड्याची तळी आणि दत्तगुफा मंदिर ही दोन ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित केली जाणाराहेत. त्यासाठी अनुक्रमे २ कोटी ५२ लाख आणि २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात येणाराहेत, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सोमवारी सभागृहाला दिली. आमदार सुभाष फळदेसाई यांनी याविषयी प्रश्न प्रश्न विचारला होता. दरम्यान, साळावली धरणाकडेलाही कॉटेजिस खाजगी उद्योगांना दिले जाणाराहेत. त्यासाठी तयारी केल्याची माहिती मंत्री परुळेकर यांनी दिली.Read More
‘फुटबॉल भक्ताचा ‘फिव्हर’ श्री सिद्धेश्वराच्या मूर्तीला घातला ‘क्रॉस’ उगे गावात निर्माण झाला तणाव पोर्तुगालने युरो चषक पटकावल्याचा झाला उन्माद संशयित लुकास कार्व्हालो पोलिसांच्या ताब्यात घटनेमुळे देवाचे पावित्र्य भंग झाल्याचा देवस्थान समितीचा दावा फ्रान्सवर ऐतिहासिक मात करोत पोर्तुगालनं युरो चषक पटकावल्यावर एका ‘फुटबॉल भक्ता’नं उगेतील श्री सिद्धेश्वर देवाच्या मूर्तीवर क्रॉस घातला. या प्रकारानं सोमवारी सांगे भागात खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन लुकास कार्व्हालो या संशयित युवकाला अटक केली असता, त्यानं या कृत्याची कबुली दिली आणि तणाव निवळला. दरम्यान, या युवकाला कोणी फूस लावून हे कृत्य करायला लावलं का? याचीRead More
Close