SHASTRA PUJA Tag

Posted On October 11, 2016By Akshay LadIn Local, People, Top Stories

SHASTRA PUJA AND EXHIBITION AT MAPUSA

म्हापशात दुर्मिळ शस्त्रांचे पूजन, प्रदर्शन एके ४७ पाहण्याची मिळाली नागरिकांना संधी राष्ट्रहित मंच म्हापसातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी पोलिस स्थानकाच्या सभागृहात दुर्मिळ शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. यामध्ये पहिल्यांदाचं ‘एके ४७’ पाहण्याची संधी गोवेकरांना लाभली. सकाळी शस्त्रपूजा झाल्यावर शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन दुपारी १ वाजेपर्यंत लोकांसाठी खुलं होतं. म्हापसा इथं मंगळवारी झालेल्या शस्त्र प्रदर्शनात सुमारे १५० परवानाधारकांची, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर शस्त्रांमध्ये प्राचीन काळी युद्धात वापरल्या गेलेल्या तलवारी, ढाली, भाले तसंच आधुनिक काळातील बंदूका, पिस्तूले प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.Read More
Close