SUDIN DHAVALIKAR Tag

फोंड्याचा सांडपाणी प्रकल्प वर्षभरात होणार पूर्ण बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची सभागृहाला ग्वाही सांडपाणी प्रकल्पावरून विरोधकांची सरकारवर सरबत्ती फोंडाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेल्या वर्षी चालू केला होता. हा प्रकल्प एका वर्षांत पूर्ण करून लोकार्पण केलं जाईल, अशी ग्वाही बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी सभागृहाला दिली. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या असता मंत्री ढवळीकर यांनी सदर आश्वासन दिलं. या प्रश्नावरून आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो आणि प्रतापसिंह राणे यांनी मंत्री ढवळीकर यांना घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; मात्र ढवळीकर यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान,Read More
बांधकाममंत्र्यांचा शांताराम नाईक यांच्यावर घणाघात नाईक यांना राज्यसभेवर पाठवणे ही गंभीर चूक राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी काहीही केले नाही मंत्री सुदिन ढवळीकर यांची घणाघाती टीका बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यावर जाहीर कार्यक्रमात शाब्दिक टोले हाणले. २०१२ पूर्वी राज्यावर कॉंग्रेसचं शासन होतं. केंद्रातही कॉंग्रेस शासन होतं. त्यामुळं राज्यसभेवर शांताराम नाईक यांना पाठवण्यात आलं. पण नाईक यांनी गोव्यासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवल्याची आम्हाला खंत वाटते, अशी झणझणीत टीका मंत्री ढवळीकर यांनी यावेळी केली.Read More
वर्षभरात राज्यातील सर्व पुलांचे होणार ऑडीट धोकादायक पुलांची होणार पुनर्बांधणी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती राज्यातील पुलांचे गुणवत्ता तपासण्यासाठी एका एजन्सीला कंत्राट दिलं असून येत्या वर्षभरात सर्व पुलांचा लेखाजोखा पूर्ण करेल, अशी माहिती बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलीये. त्याचबरोबर धोकादायक पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.Read More
पत्रादेवी ते बांबोळी महामार्गाचे काम दीड वर्षांत पूर्ण होणार महामार्गासाठी भूसंपादन केल्यास मालकाला देणार उचित लाभ बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा पत्रादेवी ते बांबोळी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; मात्र कुठ्ठाळीतील नागरिकांनी यात आडकाठी आणलीये. त्यांनाही मंत्री ढवळीकर यांनी सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील त्यांना उचित लाभ दिला जाईल, अशी घोषणा यावेळी मंत्री ढवळीकर यांनी केलीRead More
वयोमानामुळे रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी डागली तोफ सत्ता असताना रवी नाईक यांनी काहीही केले नाही सत्ता गेल्यानंतर आठवला विकास : बांधकाममंत्री वय झाल्याने माजी गृहमंत्री रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट झालीये. त्यामुळं ते सध्या काहीही बरळत आहेत, अशी झणझणीत प्रतिक्रिया बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलीये. फोंड्यातील सर्व विकासकामे मीच केल्याचा दावा रवी नाईक यांनी केला होता. त्याला ढवळीकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.Read More
Close