TRANSPORT Tag

वाहतूक खात्याच्या मोबाईल अॅपला उदंड प्रतिसाद अॅपवरून ३२५ तक्रारींची नोंद; २६७ तक्रारी निकालात वाहतूक खात्याच्या उपसंचालकांनी दिली माहिती बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात नागरिकांना थेट तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी वाहतूक खात्यानं मोबाईल अॅप चालू केलाय. या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अॅपवरून ३२५ तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील २६७ तक्रारी निकालात काढल्या असून उरलेल्या तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वाहतूक उपसंचालकांनी इन गोवाशी बोलताना दिली. दरम्यान, १ ऑक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ८४६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.Read More
वाहतूक खाते होणार हायटेक वाहन चालकांचा परवाना मिळणार घरपोच वाहनाचे आरसी पुस्तिकाही मिळणार पोस्टाने वाहतूक खात्याच्या संचालकांनी दिली माहिती वाहतूक खातं अधिकाधिक जनताभिमुख करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. यामध्ये वाहन चालकांचा परवाना आणि वाहनाचं आरसी पुस्तिका घरपोच देण्याची सुविधा येत्या चार दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक संचालकांनी पत्रकारांना दिली. यासाठी टपाल खात्याशी करार करण्यात येत असल्याचंही संचालकांनी यावेळी दिलं.Read More
Close